Gautam Gambhir Mentoring KKR Players for IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाला २२ मार्चपासून सुरू होत आहे. हंगामातील पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबी यांच्यात होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व फ्रँचायझींचे सराव शिबिरं त्यांच्या घरच्या मैदानावर सुरू केली आहेत. केकेआर संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सच्या सराव शिबिरात पोहोचला. येथे त्याने केकेआरचा मार्गदर्शक म्हणून खेळाडूंना पहिले संबोधित केले. गौतम गंभीर खेळाडूंना संबोधित करतानाचा व्हिडीओ केकेआरने शेअर केला आहे.

इथे कोणीही वरिष्ठ-कनिष्ठ नाही –

केकेआर संघाच्या सराव सत्रादरम्यान खेळांडूना मार्गदर्शन करताना गौतम गंभीर म्हणाला, “तुम्ही सर्वजण एका यशस्वी फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करत आहात. तुम्हाला हे सुनिश्चित करावे लागेल की तुम्ही त्याच पद्धतीने प्रशिक्षण घ्याल, त्याच पद्धतीने खेळाल आणि एकच दृष्टिकोन ठेवाल. मी एका गोष्टीची हमी देतो. मी काय देईन. खेळाडूंना पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे आहे. हे खूप महत्त्वाचे आहे. माझ्यासोबत खेळलेल्यांना माहित आहे की या संघात सर्वांना समान वागणूक दिली जाईल. इथे कोणीही वरिष्ठ-कनिष्ठ नाही.”

Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
Gautam Gambhir has challenged Australia ahead Border-Gavaskar Trophy
Gautam Gambhir : ‘कोणत्याही प्रकारची खेळपट्टी तयार करा, आम्ही…’, गौतम गंभीरने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला दिले आव्हान
Gautam Gambhir Backs KL Rahul With Big Statement Said How Many Teams Have a Player Like Him Border Gavaskar Trophy
Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
Gautam Gambhir Press conference Team is prepared with Abhimanyu Easwaran and KL Rahul as potential replacements for the opening slot
Gautam Gambhir : रोहित शर्मा नाही तर कोण…? बुमराह नेतृत्व करणार अन् ‘हा’ खेळाडू देणार सलामी, गौतम गंभीरने केलं स्पष्ट
Gautam Gambhir Statement on Ricky Ponting Over Virat Kohli Rohit Sharma Criticism Said What does Ponting to has to do with Indian cricket
Gautam Gambhir: “पॉन्टिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? त्याने तर…”; रोहित-विराटबद्दल केलेल्या वक्तव्यावर गंभीर संतापला

संघासाठी सर्वकाही झोकून देऊन प्रयत्न करायचे आहेत –

गौतम गंभीर पुढे म्हणाला, “आपल्यासाठी हा हंगाम आजपासून सुरू होत आहे. शारीरिक असो किंवा मानसिक, आपण चॅम्पियन होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. आपण एका यशस्वी फ्रेंचायझीसाठी खेळत आहोत, याचा आपल्या अभिमान असला पाहिजे. त्यामुळे हा मोसम आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. एक मार्गदर्शक म्हणून, मला विश्वास आहे की आपल्याला संघासाठी सर्वकाही झोकून देऊन प्रयत्न करायचे आहेत. त्याचबरोबर खेळाडूंना स्वातंत्र्य देणे, हे माझे पहिले प्राधान्य आहे. कारण ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.’

हेही वाचा – IPL 2024 : आयपीएलसाठी हिंदी-इंग्रजी कॉमेंट्री पॅनल जाहीर! रवी शास्त्री-सुनील गावसकरसह अनेक दिग्गजांच्या नावाचा समावेश

आपल्या सर्वांचे एकच ध्येय –

गौतम गंभीर आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाला की, “आपल्या सर्वांचे एकच ध्येय आहे की संघाला चॅम्पियन बनवणे. त्यामुळे आपल्याला त्याचा पाठपुरावा करायचा आहे. कठोर परिश्रम घेऊन २६ मे रोजी (संभाव्य तारीख) अंतिम सामना खेळायचा आहे. त्या गोष्टीची तयारी २३ मार्च पासून नव्हे, तर आजपासूनच सुरु होत आहे. आपल्याला या एका उद्देशाने पुढे जाऊ आणि जोरदार स्पर्धा करू. मला पूर्ण आशा आहे की आपण यात यशस्वी होऊ. मी तुम्हाला खात्री देतो की सपोर्ट स्टाफ तुमच्याशी पूर्णपणे प्रामाणिक असेल. त्यामुळे तुम्ही आम्हाला कधीही आणि कुठेही प्रश्न विचारू शकता.”

हेही वाचा – सुनील गावसकरांनी BCCIला दिली भन्नाट आयडिया; म्हणाले, ‘रणजी ट्रॉफी सामन्याची फी दुप्पट किंवा तिप्पट करा…’

कोलकाता नाइट रायडर्सचा संपूर्ण संघ –

श्रेयस अय्यर (कर्णधार), मनीष पांडे, रिंकू सिंग, साकिब हुसेन, नितीश राणा, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शेरफेन रदरफोर्ड, अंगक्रिश रघुवंशी, केएस भरत, फिलिप सॉल्ट, रहमानउल्ला गुरबाज, वायकर अरबाज , चेतन साकारिया, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क, मुजीब उर रहमान, हर्षित राणा आणि सुयश शर्मा.