Aakash Chopra on SKY place in India squad for 2025 Champions Trophy : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. तो म्हणाले की टी-२० मधील नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादव एकदिवसीय संघात फिट बसत नाही. त्यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार नाही.

बीसीसीआयने नुकतीच सूर्यकुमारची भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. कर्णधारपदाच्या शर्यतीत त्याने हार्दिक पंड्याला मागे टाकले. सूर्यकुमार यादवला टीम इंडियाच्या टी-२० संघाचा कर्णधार जरी नियुक्त केले असले, तरी त्याला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे संघात स्थान देण्यात आलेले नाही. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत निवडमितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना याबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सूर्या सध्या फक्त टी-२० सेटअपचा एक भाग असेल.

shivraj singh chauhan Maha Vikas Aghadi and Rahul Gandhi mislead the public with false promises and no development vision
शिवराजसिंह चौहान म्हणतात राहुल गांधींकड विकासाचे कुठलेही व्हीजन नाही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!
KL Rahul Statement on Sanjiv Goenka Animated Chat in IPL 2024 loss Said Wasn’t the nicest thing Ahead
KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य

सूर्या भारताच्या चॅम्पियन २०२५ च्या संघात असणार की नाही?

आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “सूर्यकुमार यादव एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात पोहोचलेल्या संघाचा भाग होता. तो अंतिम सामन्यात खेळलेल्या संघातही होता. त्याने डेव्हिड मिलरचा अप्रतिम झेल घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. मात्र, आता सूर्या वनडे संघाचा भाग असणार नाही. कारण जेव्हा सूर्याविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सांगण्यात आले की तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. पण तो फक्त टी-२० इंटरनॅशनलमध्येच खेळताना दिसेल. वनडेमध्ये त्याच्या नावाचा विचार करण्यात आला नाही. जर त्याच्या नावाची चर्चा होत नसेल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जवळ येत असेल, तर सूर्यकुमार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिसणार नाही, असे तुम्ही गृहीत धरू शकता.”

हेही वाचा – Shubman Gill : ‘एक दिवस शुबमन तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्त्व करेल…’, माजी बॅटिंग कोचचे मोठे वक्तव्य

आकाश चोप्रा काय म्हणाला?

मात्र, शुबमन गिल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार हे निश्चित असल्याचे माजी क्रिकेटपटूने सांगितले. आकाश चोप्रा म्हणाला, “गिल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिसणार आहे. कारण आगरकर म्हणाले की गिल हा तिन्ही फॉरमॅटचा खेळाडू आहे. गौतम गंभीरलाही वाटते की तिन्ही फॉरमॅटचा खेळाडू सापडला तर चांगलेच आहे. त्यामुळे शुबमनने आतार्यंत कमी सामन्यात नेतृत्व केले असले, तरी त्याला टी-२० आणि वनडे मालिकेसाठी उपकर्णधार बनवण्यात आले आहे.’

हेही वाचा – ‘तेरे इमाम के पूरे करियर पर…’, पाकिस्तानी पत्रकाराने ‘या’ खेळाडूची गांगुलीशी तुलना केल्याने चाहत्यांनी केले ट्रोल

शुबमन गिलने श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. ज्यामध्ये त्याने भारतीय संघाने त्याच्या नेतृत्त्वाखाली पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ ने जिंकली. तो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा (जीटी) कर्णधार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात २७ जुलैपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेनंतर तितक्याच सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे.