विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चांना उधाण आलं आहे. मात्र धोनीने अधिकृतपणे आपल्या निवृत्तीविषयी कोणतही वक्तव्य केलेलं नाहीये. विश्वचषकात धोनीला आपल्या संथ खेळीमुळे टीकेचं धनी व्हावं लागलं होतं. मात्र भारतीय संघाच्या माजी गोलंदाजाने या परिस्थितीमध्येही धोनीची पाठराखण केली आहे.

२०११ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य असलेल्या मुनाफ पटेलने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये धोनीची पाठराखण केली आहे. “स्वतःच्या निवृत्तीविषयी धोनीने काहीतरी योजना आखून ठेवली असणार. बीसीसीआयशी त्याची चर्चा नक्कीच झाली असेल. निवृत्तीविषयी काय करायचं हे धोनीला इतरांना सांगत बसायची गरज नाहीये. धोनीने भारतीय संघासाठी खूपकाही केलं आहे. त्याने अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही.”

विश्वचषकानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. ३ ऑगस्टपासून भारतीय संघाच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. मात्र महेंद्रसिंह धोनीने २ महिने क्रिकेट खेळणार नसल्याचं निवड समितीला कळवलं आहे. त्यामुळे ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे.

अवश्य वाचा – निवृत्तीची चर्चा सोडा, धोनीसाठी निवड समितीने आखली खास योजना ! जाणून घ्या…

Story img Loader