Inzamam-ul-Haq on Sehwag: टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत वीरेंद्र सेहवागचे नाव नेहमीच घेतले जाते. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. असाच एक डाव पाकिस्तानविरुद्ध खेळला गेला होता. सेहवागने बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. या सामन्याबाबत त्याने एक रंजक किस्सा सांगितला आहे. पाकिस्तानचा तात्कालिक कर्णधार इंझमाम-उल-हक याने त्याच्या सांगण्यावरून क्षेत्ररक्षण बदलल्याचे सेहवागने सांगितले आहे. सेहवागने सांगितले की, त्याला षटकार मारायचा होता. यावर इंझमामने एक विधान केले होते.
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक, इंझमाम-उल-हक यांनी मंगळवारी आगामी एकदिवसीय विश्वचषक २०२२च्या आयसीसीच्या वेळापत्रकाच्या घोषणेदरम्यान भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागचे कौतुक केले. बीसीसीआयचे सचिव जय शाह, महान भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग, श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आणि आयसीसीचे सीईओ ज्योफ अॅलार्डिस यांनी मंगळवारी २०२३च्या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यादरम्यान पाकिस्तानचा कर्णधार इंझमामने सेहवागच्या मैदानातील दरारा कसा होता? याबद्दल सांगितले.
पाकिस्तानचा माजी कर्णधार सेहवागचे कौतुक करताना म्हणाला, “तुम्हाला वीरेंद्र सेहवागविरुद्ध ९ खेळाडूंची नाही तर १९ क्षेत्ररक्षकांची गरज आहे.” खरे तर २००५ साली पाकिस्तान क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार होती. या मालिकेतील शेवटचा सामना बंगळुरूमध्ये खेळला गेला. पाकिस्तानने पहिल्या डावात ५७० आणि दुसऱ्या डावात २६१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ४४९ धावा आणि दुसऱ्या डावात २१४ धावा केल्या. या सामन्यात सेहवागने द्विशतक झळकावले. त्याने या सामन्याची कहाणी शेअर केली.
पाकिस्तानचा कर्णधार इंझमाम पुढे म्हणाला, “सेहवाग काय शॉट मारू शकतो या अंदाजाने मी क्षेत्ररक्षण लावले होते. तो मला म्हणाला होता मी इंजी भाई लाँग ऑन फिल्डरला थर्टी यार्ड सर्कलमध्ये बोलावून घे. मी म्हणालो सिक्स मारायला का? मी म्हणालो की जर क्षेत्ररक्षक आत नसेल तर झेल बाहेर जाऊ शकतो. जर चेंडू असा मागे पडला तर तुला चौकार मिळू शकतो. त्याने क्षेत्ररक्षकाला मागे पाठवले एवढे करूनही त्यानंतर त्याने तिथे दानिश कनेरियाच्या चेंडूवर षटकार ठोकला. यावरून सेहवाग खेळत असताना ९ नाही तर १९ खेळाडूंची गरज आहे असं मला वाटले.”
या सामन्यात टीम इंडियाला १६८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद ५७० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या डावात ४४९ धावा केल्या. पाकिस्तानने २६१ धावांवर दुसरा डाव घोषित केला. प्रत्युत्तरात भारतीय संघ २१४ धावांवर ऑलआऊट झाला.