‘‘सचिन इतक्या लवकर क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणार नाही. दोनशे कसोटी सामन्यांनंतरही तो खेळत राहील. पुढील वर्षी लॉड्सवरही तो दिसेल,’’ असे मत भारताचे माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. सचिन तेंडुलकरच्या दोनशेव्या कसोटी सामन्याची आणि त्याच्या निवृत्तीची चर्चा सध्या क्रिकेटवर्तुळात रंगते आहे. याविषयी एका प्रश्नाला उत्तर देताना शास्त्री म्हणाले की,  नोव्हेंबर महिन्यात वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून सध्या १९८ कसोटी सामने खात्यावर असलेला सचिन या मालिकेत दोनशेवा कसोटी सामना खेळणार आहे.

Story img Loader