अर्जेंटीनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू मेसीसोबत फोटो काढल्यानंतर प्रसिद्धीझोतात आलेला तरुण अफगाणी फुटबॉलपटू मुर्तझा अहमदी सध्या तालिबानच्या सावटाखाली जगतो आहे. काही दिवसांपूर्वी तालिबानच्या एका गटाने घाझ्नी प्रांतातील जाघोरी जिल्ह्यावर हल्ला केला. यानंतर मुर्तझाच्या परिवाराला सतत धमक्या मिळत असल्याचं कळतंय. मेसी कतारच्या दौऱ्यावर असताना मुर्तझाने त्याची भेट घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तालिबानच्या माणसांनी आमच्या नातेवाईकांची हत्या केली. यानंतर आम्ही सतत निवाऱ्याच्या शोधात आहोत. तालिबानची माणसं गाड्या थांबवून लोकांची हत्या करतायत. आम्हाला घराबाहेर जाऊन फुटबॉल खेळता येत नाहीये, आम्ही खुलेपणामुळे घराबाहेर पडू शकत नाहीये. आम्हाला सतत गोळीबार आणि बॉम्बस्फोटांच्या सावटाखाली रहावं लागतंय.” मुर्तझाने CNN वाहिनीशी बोलत असताना सांगितलं. मेसीसोबत फोटो काढल्यानंतर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे आपल्याला धमक्या मिळत असल्याचं म्हटलंय.

मेसीने मुर्तझासोबत फोटो काढल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थाने त्रास सुरु झालाय. केवळ तालिबान नाही तर इतर लोकांनाही असं वाटतंय की आम्हाला मेसीकडून प्रचंड पैसा मिळत आहे. यामुळे आम्ही मुर्तझाला शाळेत पाठवणं बंद केलंय, आम्ही सतत भीतीच्या सावटाखाली वावरतो आहे. मुर्तझा आपली कहाणी सांगत होता. या सर्व गोष्टींपेक्षा मुर्तझाने मेसीसोबत फोटो काढला नसता तर बरं झालं असतं.