भारताच्या वेंकट राहुल रागला याने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून युवा आशियाई क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली तर नेमबाजीत शानकी नागर याने दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये रुपेरी यश मिळविले. वेटलिफ्टिंगमध्ये वेंकटने स्नॅचमध्ये १४२ किलो तर क्लीन-जर्कमध्ये १६८ किलो असे एकूण ३१० किलो वजन उचलले. चीनच्या झिंगयु लुई याने २८५ किलो वजन उचलत रौप्यपदक मिळविले तर थायलंडच्या पिचेत मनसेरी याने २८० किलो वजन उचलून कांस्यपदक पटकाविले.
नेमबाजीत नागरने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये १९५.३ गुण मिळवीत रौप्यपदक पटकाविले. चीनच्या वुई जियेऊ याने १९५.५ गुणांसह सुवर्णपदक पटकाविले. उजबेकिस्तानच्या रेफात गिर्फानोव्ह याने १७४.७ गुणांसह कांस्यपदक मिळविले.
युवा आशियाई क्रीडा स्पर्धा : वेटलिफ्टिंगमध्ये वेंकटचा सुवर्णवेध
भारताच्या वेंकट राहुल रागला याने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून युवा आशियाई क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली तर नेमबाजीत शानकी नागर याने दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये रुपेरी यश मिळविले.
First published on: 22-08-2013 at 04:57 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young asian games venkat wins gold in 77kg weightlifting