Younis Khan Statement on Babar Azam and Virat Kohli: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची बॅट सध्या शांत आहे. त्याच्या फलंदाजीमुळे खूप टीकेला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खानने बाबर आझमला फॉर्ममध्ये येण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. यादरम्यान बोलताना विराट कोहलीबाबतही युनूस खानने मोठं वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कामगिरी पाहून बाबरला कर्णधारपद मिळाले

पाकिस्तानमधील एका कार्यक्रमादरम्यान युनूस खान म्हणाला की, पाकिस्तानी खेळाडू परफॉर्म करण्यापेक्षा जास्त बोलतात. बाबरच्या कर्णधारपदाबाबत युनूस खान म्हणाला, ‘बाबरला माझा एकच सल्ला आहे की त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे. त्याने आपला खेळ सुधारला पाहिजे. बाबर आझमला कर्णधार बनवण्यात आले, कारण तो त्यावेळच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होता. संघातील सर्वोत्तम खेळाडूला कर्णधार बनवायचे ठरले तेव्हा मी तिथे होतो. बाबर आणि इतर खेळाडूंनी मैदानावर चांगली कामगिरी केली तर त्याचे परिणाम सर्वांना दिसतील. मी पाहिले आहे की आमचे खेळाडू कामगिरीपेक्षा जास्त बोलतात.

हेही वाचा – Rohit Sharma: “रोहित तंत्रकुशल नाही, तो कठोर सरावही करत नाही”, जॉन्टी ऱ्होड्स रोहित शर्माबद्दल नेमकं काय म्हणाला? सचिनचा उल्लेख करत म्हणाला…

पाकिस्तानच्या युनूस खानने बाबर आझमला सुनावलं

पाकिस्तानला विश्वचषक जिंकून देणाऱ्या युनूस खानने सांगितले की, बाबरने कर्णधारपदाच्या वादापासून दूर राहून फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. युनूस खानने त्याला विराट कोहलीचे उदाहरण दिले. विराट कोहलीने काही काळापूर्वीच कसोटी कर्णधारपद सोडले होते. गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर बाबर आझमच्या जागी युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. मात्र, यंदाच्या टी- विश्वचषकापूर्वी बाबर पुन्हा कर्णधार झाला.

हेही वाचा – माजी भारतीय क्रिकेटपटूची अवघ्या महिनाभरात केनिया संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी, अंतर्गत वादाचा फटका

बाबर आझमला विराट कोहलीकडून शिकण्याचा दिला सल्ला

युनूस खान म्हणाला, “त्याने (बाबर आझम) कमी वयात बरेच काही साध्य केले आहे, परंतु त्याला भविष्यात काय करायचे आहे हे माहित असणे आवश्यक आहे. कर्णधारपद ही छोटी गोष्ट आहे, कामगिरी महत्त्वाची आहे. विराट कोहलीला बघा, त्याने स्वतःच कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि आता तो जगभरात विक्रम मोडत आहे. देशासाठी खेळण्याला प्राधान्य असायला हवे, हे यावरून दिसून येते. जर काही उर्जा शिल्लक असेल तर स्वत: साठी खेळा.”

विराट कोहली सध्या भारतीय संघाबरोबर बांगलादेशविरूद्धच्या मालिकेसाठी सराव करत आहे. भारताला बांगलादेशविरूद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून सुरू होणार तर दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून खेळवला जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Younis khan statement on babar azam and virat kohli slams pakistan captain for poor performance and said learn from indian batter bdg