विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने ८ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-० ने आघाडी घेतली. भारतीय संघाचा वन-डे क्रिकेटमधला हा ५०० वा विजय ठरला. या विजयानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्या संघाचं कौतुक केलं आहे.

तुमच्या ध्येयाप्रमाणेच तुमचं भविष्यही उज्वल आहे, अशा आशयाचं ट्विट करत रवी शास्त्रींनी टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. टी-२० मालिका गमावल्यानंतर भारतीय संघासमोर वन-डे मालिका जिंकण्याचं मोठं आव्हान असणार आहे. वन-डे विश्वचषकाआधी भारतीय संघाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका असल्यामुळे या मालिकेत भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : आता तुझा सामना सुपरमॅनसोबत ! मुंबई इंडियन्सचं विराटला अनोखं आव्हान

Story img Loader