युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीत विजयी सलामी दिली. युकीने संघर्षपूर्ण लढतीत अलेक्झांडर नेडोव्हयोसेव्हला ६-३, ३-६, ९-७ असे नमवले. युकीने या सामन्यात नऊ ब्रेकपॉइंट्स वाचवले. दुसऱ्या फेरीत युकीचा सामना जर्मनीच्या जेसन क्युबलरशी होणार आहे. रामकुमारने अर्जेटिनाच्या गाइडो आंद्रोइझोवर ६-४, ७-६ (४) अशी मात केली. रामकुमारचा पुढचा सामना अमेरिकेच्या जेर्ड डोनाल्डसनशी होणार आहे. सोमदेवने इन्झो कोऊकार्डवर ६-२, ४-६, ७-५ असा विजय मिळवला. सोमदेवची पुढची लढत इव्हेन्जी डॉन्सकॉयशी होणार आहे.
टेनिस : युकी, रामकुमारची विजयी सलामी
युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीत विजयी सलामी दिली. युकीने संघर्षपूर्ण लढतीत अलेक्झांडर नेडोव्हयोसेव्हला ६-३, ३-६, ९-७ असे नमवले.
First published on: 21-05-2015 at 05:55 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuki bhambri ramkumar ramanathan win french open qualifying openers