युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीत विजयी सलामी दिली. युकीने संघर्षपूर्ण लढतीत अलेक्झांडर नेडोव्हयोसेव्हला ६-३, ३-६, ९-७ असे नमवले. युकीने या सामन्यात नऊ ब्रेकपॉइंट्स वाचवले. दुसऱ्या फेरीत युकीचा सामना जर्मनीच्या जेसन क्युबलरशी होणार आहे. रामकुमारने अर्जेटिनाच्या गाइडो आंद्रोइझोवर ६-४, ७-६ (४) अशी मात केली. रामकुमारचा पुढचा सामना अमेरिकेच्या जेर्ड डोनाल्डसनशी होणार आहे. सोमदेवने इन्झो कोऊकार्डवर ६-२, ४-६, ७-५ असा विजय मिळवला. सोमदेवची पुढची लढत इव्हेन्जी डॉन्सकॉयशी होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा