यंग प्रभादेवी क्रीडा मंडळाच्या हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त बुधवारपासून (९ जानेवारी) सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत क्रीडारसिकांना राज्यातील अव्वल ३१ संघांचा मॅटवरील थरार पाहायची संधी मिळणार आहे. मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या या कबड्डी स्पध्रेत प्रथम श्रेणी स्थानिक पुरुष गटात १६ आणि कुमार गटात १२ संघांची जेतेपदासाठी चुरस रंगेल. बुधवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते या हीरकमहोत्सवी राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेचे उद्घाटन होणार आहे.
पुरुष गटातील विजेत्या संघाला ४०,०६० रुपये, उपविजेत्या संघाला २५,०६० रुपये याचप्रमाणे आकर्षक चषक प्रदान करण्यात येईल. स्पध्रेत सर्वोत्तम ठरणाऱ्या खेळाडूला मालिकावीर पारितोषिक पुरुष गटासाठी ११,०६० रुपये तर कुमार गटासाठी ५,०६० रुपये ठेवण्यात आले आहे.
यंग प्रभादेवी मंडळाची वेबसाइट
यंग प्रभादेवी क्रीडा मंडळाच्या हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त यंग प्रभादेवी क्रीडा मंडळाच्या वेबसाइटचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. http://www.youngprabhadevi.com असे या संकेतस्थळाचे नाव असून ११ जानेवारीला या वेबसाइटचे उद्घाटन होणार आहे.

Story img Loader