Yuvraj Singh and Gautam Gambhir prediction for team India Game Changers: भारतीय संघ २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तिसऱ्यांदा वनडे वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघात अनेक स्टार खेळाडू आहेत ज्यात रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल सारख्या खेळाडूंचा समावेश आहे, परंतु यावेळी युवराज सिंगने सांगितले की कोणते तीन खेळाडू भारतासाठी गेम चेंजर्स बनतील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे युवराज सिंगने गेम चेंजर्स म्हणून ज्या खेळाडूंची निवड केली त्यात त्याने गिल, कोहली किंवा रोहित शर्माचे नाव घेतले नाही.
बुमराह, सिराज आणि जडेजा भारतासाठी गेम चेंजर असतील –
भारतीय संघ सध्या एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असून ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या विश्वचषकाचा मोठा दावेदार म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जात आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी माजी भारतीय फलंदाज युवराज सिंग यांनी सांगितले की यावेळी कोणते खेळाडू भारतासाठी गेम चेंजर्स सिद्ध होऊ शकतात. युवीच्या मते जसप्रीत बुमराह, मोहम्मद. सिराज आणि रवींद्र जडेजा यावेळी टीम इंडियासाठी मोठे गेम चेंजर असतील. हर्षा भोगले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गौतम गंभीरशी संवाद साधताना त्यांनी सांगितले.
युवराज सिंग म्हणाला की, यावेळी माझ्या मते टीम इंडियासाठी गेम चेंजर असणारा संघ बुमराह, सिराज आणि जडेजा आहे. बुमराह आणि जडेजाला याचा अनुभव आहे, तर काही काळ सिराजने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे ती आश्चर्यकारक आहे. जेव्हा गंभीरला विचारण्यात आले की त्याच्या मते गेम चेंजर कोण असेल, तेव्हा त्याने बुमराह आणि सिराजची नावे घेतली, परंतु जडेजाऐवजी त्याने रोहित शर्माची निवड केली.
गौतम गंभीर म्हणाला की, रोहित शर्मा यासाठी कारण तुम्हाला अशी विकेट मिळणार आहे, जिथे फलंदाजीसाठी खूप पोषक खेळपट्टी असेल.
रोहित शर्मा ज्या फॉर्ममध्ये आहे, तो खूप धावा करेल. युवीने रोहित शर्माचेही कौतुक केले आणि सांगितले की, सर्वांना माहित आहे की तो एक महान फलंदाज आहे आणि खूप काही करू शकतो. रोहित शर्मा आपला दुसरा एकदिवसीय विश्वचषक खेळणार आहे, तर सिराज प्रथमच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहे.
टीम इंडियाबद्दल बोलायचे, तर सध्या भारतीय संघ विश्वचषकापूर्वी होणाऱ्या सराव सामन्यासाठी गुवाहाटीला पोहोचला आहे. भारतीय संघाला आपला पहिला सराव सामना इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना शनिवारी खेळला जाईल. त्तत्पूर्वी विश्वचषकाच्या भारतीय संघात अक्षर पटेल ऐवजी रविचंद्रन आश्विनचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा – Asian Games: नेमबाजीत टीम इंडियाची घोडदौड कायम! पुरुषांनी सुवर्ण तर महिला संघाने पटकावले रौप्यपदक
विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.