Yuvraj Singh and Hazel Keech purchased a new luxurious home : टीम इंडियाचा माजी फलंदाज युवराज सिंग आणि पत्नी हेजल कीच यांनी मायानगरीमध्ये त्यांचे नवीन घर विकत घेतले आहे. युवीचा हा आलिशान फ्लॅट त्याच इमारतीत आहे, ज्यामध्ये विराट कोहली-अनुष्का शर्मा यांचाही फ्लॅट आहे. युवराजच्या या नवीन फ्लॅटची किंमत ६४ कोटी रुपये आहे. युवीच्या या फ्लॅटमध्ये अनेक सुविधा आहेत आणि तो १६ हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे.

युवराज सिंगने घेतले नवीन घर –

युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल कीच यांनी मुंबईत नवीन घर घेतले आहे. ज्या इमारतीत विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा फ्लॅट आहे त्याच इमारतीत युवीने फ्लॅट घेतला आहे. युवीचा फ्लॅट २९व्या मजल्यावर आहे, तर कोहली या इमारतीच्या ३५व्या मजल्यावर राहतो. युवराज आणि हेजलच्या नवीन फ्लॅटची लिव्हिंग रूम सुंदर पेंटिंग्जने सजलेली आहे. युवीच्या बाल्कनीतून मुंबई शहराचे सर्वोत्कृष्ट दृश्य पाहता येते, जे हृदय आणि मन दोन्ही ताजेतवाने करू शकते. युवी आणि हेजलला खेळांची खूप आवड आहे आणि त्यांच्या इमारतीत एक वेगळा गेम झोन आहे.

virat kohli anushka sharma alibag bunglow gruhapravesh
Video : विरुष्काच्या अलिबागमधील नव्या घराचा होणार गृहप्रवेश, फुलांनी सजलेल्या बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज “
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”
Yuvraj Singh Father Yograj Singh Big Revelation He Wanted to Shoot Kapil dev and went House with pistol
युवराज सिंहचे वडील कपिल देव यांना मारण्यासाठी बंदूक घेऊन पोहोचले होते घरी, स्वत: केला खुलासा; काय आहे नेमकं प्रकरण?
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
Flag hoisting held on January 26 on islands and forts of Konkan
कोकणातील निर्मनुष्य बेटे आणि किल्ल्यांवर २६ जानेवारीला ध्वजारोहण होणार

युवराजच्या फ्लॅटची किंमत विराटच्या फ्लॅटपेक्षा दुप्पट –

युवराज आणि हेजलच्या नवीन फ्लॅटची बेडरूम पाहण्यासारखी आहे. बेडरूममध्ये चमकदार मार्बलचा वापर करण्यात आला आहे. भिंतींना पांढऱ्या रंगात रंगवण्यात आले असून अप्रतिम रचना करण्यात आल्या आहेत. युवराजच्या फ्लॅटची किंमत ६४ कोटी रुपये आहे, जी विराट कोहलीच्या फ्लॅटच्या जवळपास दुप्पट आहे. एकाच इमारतीत असूनही कोहलीच्या फ्लॅटची किंमत ३४ कोटी रुपये आहे.

हेही वाचा – MUM vs ROI : इराणी चषकात अभिमन्यू ईश्वरनचे हुकले द्विशतक, मग असा काढला राग, पाहा VIDEO

इतर कोणकोणत्या ठिकाणी युवराजची घरे आहेत?

केवळ मुंबईतच नाही तर युवराज सिंगची अनेक ठिकाणी आलिशान घरे आहेत. युवीची गुरुग्राममध्येही खास मालमत्ता आहे, जी डीएलएफ सिटीमध्ये आहे. इथेही युवराज विराट कोहलीचा शेजारी आहे. टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाचे दिल्लीतील छतरपूरमध्ये फाइव्ह बीएचके पेंटहाऊसही आहे. याशिवाय युवराजचा पंचकुलामध्ये एक उत्कृष्ट बंगलाही आहे. लग्नाच्या वेळी युवीच्या या घरात डोली समारंभही आयोजित करण्यात आला होता.

Story img Loader