Yuvraj Singh Old Video of Statement on Father’s Mental Health: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि युवराज सिंगचे वडिल योगराज सिंग यांच्या एका मुलाखतीने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. अष्टपैलू युवराज सिंगच्या वडिलांनी भारताच्या विश्वचषक विजेत्या कर्णधारांबाबत असे काही विधान केले की त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. कपिल देव आणि एमएस धोनीवर त्यांनी शाब्दिक हल्ला केला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की एमएस धोनीमुळे त्यांच्या मुलाची कारकीर्द संपली. युवी अजून ४-५ वर्षे खेळू शकला असता. तर कपिल देव यांच्यावरही कठोर शब्दात वक्तव्य केले. या त्यांच्या वक्तव्यानंतर युवराज सिंगचा एक जुना व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योगराज सिंग यांनी धोनीला कधीच माफ करणार नाही, त्याने आपला चेहरा आरश्यात पाहावा अशी वक्तव्य त्यांनी केली. तसेच कपिल देव यांच्यावरही विचित्र वक्तव्य केले.. जेव्हा योगराज सिंह यांची ही मुलाखत व्हायरल झाली, त्यांच्या वक्तव्यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली तर काहींना त्यांना सुनावलं. दरम्यान, त्यांचा मुलगा युवराज सिंगची एक जुनी मुलाखतही व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये त्याने कबूल केले होते की त्याच्या वडिलांना मानसिक समस्या आहे.

हेही वाचा – Harbhajan Singh: “धोनी खेळाडूंशी बोलत नाही, तर रोहित…” भारतीय कर्णधारांवर हरभजन सिंगचे वक्तव्य, सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून ‘या’ खेळाडूला पसंती

युवराज सिंगने काही महिन्यांपूर्वी टीआरएस पॉडकास्टमध्ये कबूल केले होते की त्याच्या वडिलांना मानसिक समस्या आहे, परंतु त्याचे वडील हे स्वीकारत नाहीत. युवराज सिंग म्हणाला होता, “मला वाटतं की माझ्या वडिलांना मानसिक समस्या आहे आणि ही गोष्ट ते स्वीकारू इच्छित नाहीत, परंतु मला वाटते की त्यांना काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे, परंतु ते ही बाब स्वीकारत नाही आणि हे असंच आहे जे आम्ही बदलू शकत नाही.”

हेही वाचा – Yograj Singh on Kapil Dev: “मी कपिल देवला सांगितलेलं, तुझी अशी अवस्था करेन…”, युवराजचे वडिल योगराज सिंगांचं धक्कादायक वक्तव्य

स्वीचला दिलेल्या एका मुलाखतीत योगराज सिंह धोनीबद्दल म्हणाले होते, “मी एमएस धोनीला कधीही माफ करणार नाही. त्याने आरशात आपला चेहरा पाहावा. तो एक महान क्रिकेटर आहे, पण त्याने माझ्या मुलाबरोबर जे काही केले ते आता समोर येत आहे. मी त्याला कधीच माफ करू शकत नाही. त्या माणसाने (धोनी) माझ्या मुलाचं आयुष्य खराब केलं. युवराज नक्कीच अजून ४-५ वर्षे खेळला असता.”

हेही वाचा – Yograj Singh: “धोनीमुळे युवराजने लवकर निवृत्ती घेतली…”, वडिल योगराज सिंग यांचा गौप्यस्फोट

माजी क्रिकेटपटू कपिल देवबद्दल म्हणाला होता, ““मला आयुष्यात काही लोकांना दाखवायचे आहे की, योगराज सिंग नेमका काय आहे. ज्याला त्या लोकांनी खाली खेचले. आज संपूर्ण जग माझ्या पायाशी उभे आहे, मला सलाम करत आहे आणि ज्या लोकांनी माझ्याबरोबर वाईट केले होते… काहींना कॅन्सर झाला आहे, काहींचे घर गेले आहे, काहींना त्यांचा मुलगा गमवावा लागला आहे आणि मी कोणाबद्दल बोलत आहे हे तुम्हाला माहिती आहे… तो माणूस म्हणजे आमच्या काळातील सर्वकालीन सर्वात महान कर्णधार कपिल देव आहे, मी त्याला सांगितले होते की तुझी अशी अवस्था करेन की सारं जग त्याला वाईट बोलेल… आज युवराज सिंगकडे १३ ट्रॉफी आहेत आणि तुझ्याकडे फक्त एक विश्वचषक आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuvraj singh on father yograj singh says my father has mental issues old video goes viral after rant against ms dhoni and kapil dev bdg