Yuvraj Singh Reveals Hilarious Incident Border Gavaskar Trophy 2007-08: येत्या २२ नोव्हेंबर २०२४ पासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बहुप्रतिक्षित अशी बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळवली जाणार आह. कट्टर प्रतिस्पर्धक असलेल्या या दोन्ही संघांमधील हे सामने पाहण्यात एक वेगळा रोमांच असतो. या ट्रॉफीचे सर्व सामने खूपच रोमांचक असतात तर किस्सेही कायम लक्षात राहण्यासारखे असतात. २००७-०८ची बॉर्डर गावसकर ट्रॉफी हे मंकी गेट प्रकरणामुळे चर्चेत होती. पण युवराज सिंगने या सामन्यांमधील एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

क्लब प्रेरी फायर पॉडकास्टवर बोलताना युवराज सिंगने हा किस्सा सांगितला. पॉडकास्टवर बोलताना युवराज सिंगने सांगितले की या स्पर्धेदरम्यान तो एका अभिनेत्रीला डेट करत होता, जिचे स्लिप-ऑन्स (चप्पल) घालून तो एअरपोर्टवर गेला जे पाहून सर्वच त्याची मजा घेत होते.

bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
yograj singh criticise aamir khan movie
आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…

युवराज सिंगने किस्सा सांगताना म्हटलं, “मी तेव्हा एका अभिनेत्रीला डेट करत होतो, तिचं नाव मी नाही घेणार. ती त्या दरम्यान खूप प्रसिद्ध आणि अनुभवी अभिनेत्री होती. आम्ही बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो, तेव्हा ती अॅडलेटमध्ये शूट करत होती.”

हेही वाचा – Vinesh Phogat: विनेश फोगटला ‘NADA’ने बजावली नोटीस, १४ दिवसांत मागितले उत्तर; काय आहे संपूर्ण प्रकरण?

युवराजने तिला आधीच सांगितले होते की, या महत्वाच्या कसोटी मालिकेवर त्याला लक्ष केंद्रित करायचं आहे त्यामुळे मला भेटू नकोस पण तरीही ती त्याचा पाठलाग करत कॅनबेरापर्यंत पोहोचली होती. “मी तिला सांगितलं होतं, हे बघ काही दिवस आपण नको भेटूया, कारण मी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे आणि मला फोकस करून खेळायचं आहे. तिने अक्षरश माझ्या बसचा कॅनबेरापर्यंत पाठलाग केला. दोन कसोटी सामन्यांमध्ये माझी साधारण कामगिरी राहिली, मी फार धावा करू शकलो नाही,” असं युवराजने सांगितलं.

युवराज सिंगने यानंतर तिच्याशी या विषयावर बोलायचं ठरवलं, युवराज गर्लफ्रेंड अभिनेत्रीला म्हणाला, “तू इथे काय करतेयस? आणि यावर तिने उत्तर दिलं, मला तुझ्याबरोबर इथे वेळ घालवायचा आहे.” यानंतर या घटनेने एक मजेशीर वळण घेतलं आणि युवराज सिंगबरोबर एक खूपच हास्यास्पद किस्सा घडला.

हेही वाचा – IPL Player Auctions: BCCI आयपीएल लिलावासाठी बदलणार मोठा नियम, मुंबई इंडियन्सला होणार तगडा फायदा

पुढे सांगताला युवराज म्हणाला, मी सकाळी तिला विचारलं, “अरे माझं शुज कुठे आहेत? ती म्हणाली, मी ते बॅगेत पॅक केले. मग मी विचारलं, अरे मग मी बसमध्ये काय घालून जाऊ? यावर ती म्हणाली, माझी चप्पल घाल… यानंतर त्याचे शूज पॅक केल्याने युवराजला जबरदस्ती तिचे गुलाबी रंगाचे चप्पल घालून तो टीम बसमध्ये गेला.”

टीम बसमध्ये युवराज जाताच जेव्हा खेळाडूंनी हे पाहिलं. युवराज ती गुलाबी चप्पल कोणी पाहू नये म्हणून लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून सर्वच जण टाळ्या वाजवत होते, ते सांगताना युवराज म्हणाला, “मी एअरपोर्टवर पोहोचून नवीन चप्पल घेईपर्यंत मला जबरदस्ती ते गुलाबी रंगाचे तिचे स्लिप-ऑन्स घालावे लागले.” युवराज सिंगने सांगितलेल्या या किस्सानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये नक्कीच चर्चा सुरू झाली आहे.

Story img Loader