वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आणि भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग हे खूप चांगले मित्र आहेत. ते अनेकदा मैदानाबाहेर मस्ती करताना दिसत असतात. ख्रिस गेल तर कायम आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखला जातो. त्याचा सध्या एक गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. युवराज सिंग आणि ख्रिस गेल यांच्या या व्हिडीओला तुफान प्रतिसाद मिळतो आहे.

CoronaVirus : विश्वनाथन आनंदला ‘करोना’चा दणका

ख्रिस गेल आपल्या IPL मधील सहकाऱ्यांसोबत एका ठिकाणी होता. तो सहकाऱ्यांसोबत मजा मस्ती करत होता. त्यावेळी सहकाऱ्यांना गेलची फिरकी घेण्याचा मोह आवरला नाही. सहकाऱ्यांनी त्याला एक हिंदी डायलॉग बोलण्याचा आग्रह केला. सदैव आव्हान पेलणारा गेलदेखील मागे हटला नाही. ‘कॉन्फिडन्स मेरा, कब्र बनेगी तेरी’ हा डायलॉग त्याला बोलायला लावण्यात आला. त्यावेळी युवराज त्याला मागून पुढील शब्द सांगत होता. पण गेलला तो डायलॉग पूर्ण करता आला नाही. त्याने कब्र बनेगी तेरी हा डायलॉग बोलताना स्वत:च्या पदरचे काही शब्द बोलत वाक्य म्हटलं. त्याच्या वाक्यामुळे गेलच्या मागे उभा असलेल्या युवराजसह साऱ्यांना हसू रोखता आले नसल्याचे दिसले.

CoronaVirus : क्रिकेट मालिका रद्द; ‘या’ मार्गे परतणार आफ्रिकेचा संघ

हा पाहा व्हिडीओ –

Video : १२ चौकार, ८ षटकार… पाहा ख्रिस लीनचं तुफानी शतक

युवराजने स्वत:च्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने “कॉन्फिडन्स मेरा, कब्र बनेगी तेरी’, खूपच भारी काका”, असं कॅप्शनदेखील दिलं.

Story img Loader