Yuvraj Singh Wishes Stuart Broad: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमध्ये खेळला जात असलेल्या सामन्यात खेळत आहे. ब्रॉडची ही शेवटची कसोटी आहे. ब्रॉडच्या निवृत्तीवर, माजी भारतीय क्रिकेटर युवराज सिंगने एक खास पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करण्यासोबतच त्याने मजेशीर कॅप्शनही लिहिले आहेत. ब्रॉडला निवृत्तीनिमित्त शुभेच्छा देताना युवराजने त्याला महान क्रिकेटपटूचा दर्जा दिला आहे.

युवराजने इंस्टाग्रामवर ब्रॉडसोबतचा एक फोटो शेअर करत त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. युवराजने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “अविश्वसनीय कसोटी कारकीर्दीबद्दल अभिनंदन. तुम्ही सर्वोत्तम आणि धोकादायक कसोटी गोलंदाजांपैकी एक आहात. एक महान खेळाडू देखील आहात! तुमचे करिअर आणि जिद्द तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल. ब्रॉडीला पुढील टप्प्यासाठी शुभेच्छा.”

I could have played more but it is always better to finish when R Ashwin statement on retirement
R Ashwin : ‘मी अजून खेळू शकलो असतो, पण…’, निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर आर अश्विनचं मोठं वक्तव्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kapil Dev Statement on Rohit Sharma Virat Kohli Test Retirement Said They know when to call time
Kapil Dev On Rohit-Virat: “ते दोघं मोठे खेळाडू, त्यांना वाटेल तेव्हा…”, कपिल देव यांचं रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Yograj Singh on Yuvraj Singh cancer 2011 world cup
Yograj Singh: “युवराज सिंग ‘त्यावेळी’ मरण पावला असता तरी मला अभिमान वाटला असता”, वडील योगराज सिंग यांचे विधान
Rohit Sharma was going to retire after the Melbourne Test but A well wisher forced to change of decision
Rohit Sharma : रोहित शर्मा मेलबर्न कसोटीनंतर घेणार होता निवृत्ती; कोणामुळे बदलला निर्णय? जाणून घ्या
devendra fadnavis sharad pawar
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, महायुतीशी जवळीक वाढतेय? फडणवीस सूचक वक्तव्य करत म्हणाले…

युवराजनेच स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सलग ६ षटकार मारले होते –

युवराज सिंग आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचे जुने नाते आहे. युवीने ब्रॉडला त्याच्या कारकिर्दीत एक अशी जखम दिली आहे, जी तो क्वचितच विसरेल. वास्तविक, युवराज सिंगने २००७ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध एका षटकात सलग ६ षटकार मारले होते. तेव्हा स्टुअर्ट ब्रॉडने नुकतीच आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तेव्हा तो २१-२२ वर्षांचा होता. ब्रॉडने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे यश संपादन केले आहे. इंग्लंडकडून कसोटीत दोनदा हॅट्ट्रिक घेणारा ब्रॉड हा एकमेव गोलंदाज आहे. यासोबतच त्याने ६०० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. ब्रॉडने त्याच्या कारकिर्दीत अनेक वेळा चमकदार कामगिरी केली आहे.

हेही वाचा – Virat Kohli: बार्बाडोसमध्ये एका चाहत्याने विराट कोहलीला दिली खास भेटवस्तू VIDEO होतोय व्हायरल

स्टुअर्ट ब्रॉडची कारकीर्द कशी राहीली?

कसोटी सामन्यांव्यतिरिक्त स्टुअर्ट ब्रॉडने इंग्लंडकडून एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळले आहेत. मात्र, स्टुअर्ट ब्रॉड कसोटी क्रिकेटपटू म्हणून खूप यशस्वी ठरला. याशिवाय एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटमध्येही त्याने आपली छाप सोडली. स्टुअर्ट ब्रॉडने १६७ कसोटी सामन्यांमध्ये २७.६७ च्या सरासरीने आणि ५५.७७ च्या स्ट्राइक रेटने ६०२ विकेट्स घेतल्या आहे. तसेच स्टुअर्ट ब्रॉडने १२१ एकदिवसीय सामन्यांमध्ये १७८ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर ५६ टी-२० सामन्यात ६५ विकेट्स आहेत.

Story img Loader