Blackmailed Yuvraj Singh’s mother: भारतीय क्रिकेटला २००७ चा टी२० विश्वचषक आणि २०११चा एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या कुटुंबाला एका प्रकरणात गोवण्याची धमकी दिली होती. याच संदर्भात मंगळवारी युवराज सिंगच्या आईकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न एका महिलेकडून केला गेला. यानंतर त्या महिलेला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला युवराज सिंगच्या भावाची काळजी घेत असे. युवराज सिंगची आई शबनम सिंग यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, युवराज सिंगचा भाऊ जोरावर सिंगची काळजी घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने २०२२ मध्ये हेमा कौशिक नावाच्या महिलेला कामावर ठेवले होते. जोरावर सिंग हे गेल्या अनेक वर्षांपासून नैराश्याचे शिकार होते. मात्र, महिलेला ‘अव्यावसायिक’ असल्याच्या कारणावरून २० दिवसांनंतर लगेच नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. हेमा कौशिक यांनी मे महिन्यात त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल आणि मेसेज पाठवून खोट्या प्रकरणात अडकवले आणि कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडे ४० लाख रुपयांची मागणी केली. ती मुलगी म्हणाली की, “गपगुमान ४० लाख रुपये दे नाहीतर तुझी बदनामी करेन.” असा मेसेज तिने युवराज सिंगच्या आईला पाठवला.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rbi received threatening phone call from Lashkar e Taiba
रिझर्व बँकेला ‘लश्कर-ए-तैयबा’च्या नावाने धमकी, कशी आणि कोणती धमकी दिली वाचा…
Sanju Samson father Viswanath video viral
Sanju Samson : ‘३-४ लोकांमुळे माझ्या मुलाची १० वर्षें वाया गेली…’, संजू सॅमसनच्या वडिलांचे धोनी-विराटसह रोहित शर्मावर गंभीर आरोप, VIDEO व्हायरल
Akshara Singh Death Threat
“५० लाख दे अन्यथा…”, प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी
Shah Rukh Khan News
शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला छत्तीसगडमधून अटक; ५० लाखांची मागितली होती खंडणी
Rupali Ganguly
Video: “खोटं बोलून करिअर…”, ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे आरोप; ईशा वर्माचा वडिलांवरही संताप
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू

हेही वाचा: Yuzvendra Chahal: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजाने केली चहलची नक्कल! चाहते म्हणतात, “ युझी जैसा…”

तक्रारीवर कारवाई करत गुरुग्राम पोलिसांनी सापळा रचून आरोपी महिलेला युवराज सिंगच्या आईकडून पाच लाख रुपये घेताना अटक केली. गुरुग्रामचे पोलिस उपायुक्त नितीश अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही आरोपी महिलेची चौकशी करत आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, १९ जुलै रोजी हेमा कौशिकने युवराजची आई शबनम सिंह यांना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून धमकी दिली होती. आरोपी महिलेने २३ जुलै रोजी संपूर्ण कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. या बदल्यात आरोपी महिलेने युवराजच्या आईकडे ४० लाख रुपयांची मागणी केली. शबनम सिंग यांनी सांगितले की, ही रक्कम मोठी आहे, त्यामुळे त्यांना व्यवस्था करण्यास वेळ लागेल. अशाप्रकारे सोमवारपर्यंत पाच लाख रुपये देण्याचे ठरले.

हेही वाचा: हरमनप्रीतचा राग टीम इंडियाला पडला महागात, आशियाई स्पर्धेतून पडली बाहेर, ICC कडून मोठी कारवाई

मंगळवारी जेव्हा आरोपी महिला पाच लाख रुपये घेण्यासाठी पोहोचली तेव्हा पोलिसांनी तिला रंगेहात पकडले. फेज-१ पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध कलम ३८४ अन्वये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. कायद्यानुसार तिची पोलीस ठाण्यातूनच जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास डीएलएफ फेज वन पोलिस स्टेशनमध्ये तैनात एसआय सरोज करत आहेत.