टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आज (१२ डिसेंबर) ४१ वर्षांचा झाला. युवराज सिंगने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले आहेत. २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषकातील त्याचे योगदान जगभरातील क्रिकेट चाहते कधीही विसरू शकत नाहीत. या डावखुऱ्या अष्टपैलू खेळाडूने दोन्ही स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत, टीम इंडियाच्या विजेतेपदात मोलाचे योगदान दिले होते. इतकं सगळं असूनही युवराज सिंगला तो योग्य तो सन्मानजनक निरोप मिळाला नाही.

युवराजला मिळाला नाही सन्मानजनक निरोप –

जून २०१७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धचा एकदिवसीय सामना युवराज सिंगच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा ठरला. त्यानंतर युवीला संघातून वगळण्यात आले. दोन वर्षे संधी न मिळाल्यानंतर १० जून २०१९ रोजी युवीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. एवढा मोठा विक्रम असूनही युवराज सिंग कधीच कर्णधार होऊ शकला नाही. २००७ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी युवराजला कर्णधार बनवण्याची चर्चा होती. पण नंतर धोनी संघाचा कर्णधार झाला. युवराजने भारताचे कर्णधारपद न मिळणे आणि संघातून वगळले जाणे, यासारख्या मुद्द्यांवर आपली व्यथा मांडली आहे.

siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Aishwarya Narkar Birthday
५० वर्षांच्या झाल्या ऐश्वर्या नारकर! ‘असा’ साजरा केला वाढदिवस; व्हिडीओत दाखवली संपूर्ण झलक, म्हणाल्या…
Tuljabhavani Devi, Shakambhari Navratri festival,
धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास ७ जानेवारीपासून प्रारंभ

वगळले जाण्याचा विचारही केला नव्हता : युवी

आज तकला दिलेल्या मुलाखतीत युवराज सिंग म्हणाला होता, ”मला कधीच वाटले नव्हते की ८-९ पैकी २ सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ झाल्यानंतर मला वगळले जाईल. मला दुखापत झाली आणि मला श्रीलंका मालिकेसाठी तयार राहण्यास सांगण्यात आले. त्यानंतर अचानक यो-यो चाचणीचे चित्र समोर आले. माझ्या निवडीत हा यू-टर्न होता. अचानक वयाच्या ३६ व्या वर्षी मला परत जाऊन यो-यो परीक्षेची तयारी करावी लागली. यानंतरही जेव्हा मी यो-यो टेस्ट पास झालो, तेव्हा मला सांगण्यात आले की मला देशांतर्गत क्रिकेट खेळायचे आहे.”

हेही वाचा – IND vs BAN 1st Test: रोहित, जडेजा आणि शमी पहिल्या सामन्यातून बाहेर; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

युवराज म्हणाला की, त्यांना (संघ व्यवस्थापनाला) वाटत होते की माझ्या वयामुळे मी यो-यो टेस्ट पास करू शकणार नाही. आणि त्यानंतर मला बाहेर काढणे त्यांच्यासाठी सोपे होईल. होय, तुम्ही म्हणू शकता की, ते एक निमित्त होते. युवराज सिंगने असेही सांगितले की, खेळाच्या शेवटच्या दिवसांमध्ये वरिष्ठ खेळाडूंना (वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खानची नावे) संघ व्यवस्थापनाने विश्वासात घेतले नव्हते. प्रत्येक खेळाडूला त्याच्या भविष्याबद्दल सांगितले पाहिजे. मलाही सांगण्यात आले नाही. भारतीय क्रिकेटमध्ये असे घडत नाही.

धोनीला कर्णधार बनवण्यात आले आहे: युवी

युवराज सिंगने एका मुलाखतीत कर्णधारपदाच्या प्रश्नावर सांगितले होते, ”भारत २००७ च्या वनडे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता. त्यावेळी भारतीय क्रिकेटमध्ये प्रचंड गदारोळ माजला होता. त्या काळात आम्हाला इंग्लंडला जायचे होते. दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडसोबत महिनाभराचा दौराही होता. याशिवाय आम्हाला टी-२० विश्वचषकही खेळायचा होता. अशा स्थितीत संघाला ४ महिने परदेशात राहावे लागणार होते.”

युवराजने सांगितले होते की, ”टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीमच्या सीनियर खेळाडूंनी ब्रेक घेण्याचा विचार केला आणि त्यांनी टी-२० वर्ल्ड कपला गांभीर्याने घेतले नाही. मला वाटले की सर्व वरिष्ठांना विश्रांती दिल्यानंतर मी टी-२० विश्वचषकात भारताचे नेतृत्व करेन. मला तशी पूर्ण आशा होती. नंतर या स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी भारताचा कर्णधार असेल असे जाहीर करण्यात आले.”

हेही वाचा – AUS vs SA Test Series: पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ प्रमुख गोलंदाजाला वगळले, पाहा संघ

युवराज सिंगचा आंतरराष्ट्रीय विक्रम –

युवराज सिंगने ३०४ एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्याने ८७०१ धावा केल्या. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण १४ शतके आणि ५२ अर्धशतकांची नोंद आहे. ४० कसोटी सामन्यांमध्ये युवराजने एकूण १९०० धावा केल्या, ज्यात ३ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर ५८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये युवराजच्या बॅटमधून ११७७ धावा झाल्या आहेत. युवीने २००७ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत स्टुअर्ट ब्रॉडला सलग सहा षटकार ठोकले होते, जे आजही चाहत्यांच्या मनात आहे. डावखुरा फिरकीपटू युवराजने कसोटीत ९, एकदिवसीय सामन्यात १११ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २८ बळी घेतले.

Story img Loader