टीम इंडियाच्या मधल्या फळीतील तडाखेबाज खेळाडू युवराज सिंग हा सिक्सर किंग या नावाने ओळखला जातो. त्याला ‘सिक्सर किंग’ अशी उपाधी मिळण्यासाठी त्याने केलेली टी २० विश्वचषक स्पर्धेतील खेळी अजूनही त्याच्या सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. पहिल्यावहिल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत युवराजने हा प्रताप केला होता. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराज मैदानावर आला, तेव्हा अँड्र्यू फ्लिंटॉफ याने त्याला डिवचले, त्यानंतर पुढच्याच षटकात युवराजने स्टुअर्ट ब्रॉड या गोलंदाजाच्या षटकात ‘त्या’ डिवचण्याचा हिशेब चुकता केला आणि ६ चेंडूंवर ६ षटकार लगावले.

PHOTO : …अन् वॉर्नरने थेट घातला बायकोचा स्विमसूट

समजा, जर युवराज उजव्या हाताने फलंदाजी करत असता तर… एका चाहत्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. @robelinda2 या युझरने ट्विटरवर असा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्याने युवराज उजव्या हाताने फलंदाजी करत असता, तर कशी फटकेबाजी केली असती? याचं उत्तर दिलं आहे.

दरम्यान, त्या सामन्यात त्याने १२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. ती खेळी त्यावेळी विक्रमी ठरली होती. १२ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक करण्याचा सनथ जयसूर्या याचा टी २० तील विक्रम होता, त्या विक्रमाशी युवराजने बरोबरी केली होती. त्या सामान्यामुळे भारताला एक विजयी सूर गवसला होता आणि भारताने तो विश्वचषक आपल्या नावे केला होता. पण युवराजला निरोपाचा सामना खेळता आला नाही. सचिन तेंडुलकर ज्या प्रकारे शेवटचा सामना मुंबईच्या मैदानावर खेळला, त्याप्रमाणे तुला शेवटचा सामना स्वतःच्या आवडत्या मैदानावर खेळावासा वाटला नाही का? किंवा तू BCCI ला या बाबतची विनंती केली नाहीस का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर, मी कधीच कोणाकडे माझ्या निरोपाचा सामना खेळण्याचा हट्ट धरला नाही, असं तो म्हणाला.