Yograj Singh on Dhoni: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि माजी अनुभवी अष्टपैलू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा माजी कर्णधार एम.एस. धोनीवर निशाणा साधला आहे. न्यूज१८ हरियाणासोबतच्या त्यांच्या खास संवादाचा जुना व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते “ धोनीच्या त्या संथ खेळीवर माझा संताप होत आहे. जर त्या आठवणी काढल्या तर माझे रक्त उसळते आणि खूप चिडचिड होते.” असे म्हणताना दिसत आहे. विश्वचषक २०१९च्या उपांत्य फेरीतील सामन्यात धोनीने जाणूनबुजून खरब फलंदाजी केली ज्यामुळे भारताचा किवी संघाकडून पराभव झाला. भारताला विश्वचषकाचे जेतेपद मिळवून द्यावा, अशी त्यांची कधीही इच्छा नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगराज सिंग म्हणाले, “रवींद्र जडेजा एका बाजूने जबरदस्त धैर्य दाखवत फलंदाजी करत होता आणि भारताला लक्ष्याच्या जवळ नेण्याचा त्याने प्रयत्न केला, दुसरीकडे धोनी त्याच्या क्षमतेनुसार खेळत नव्हता. जर तो (धोनी) त्याच्या क्षमतेच्या ४० टक्केही खेळला असता तर आम्ही ४८व्या षटकातच सामना जिंकू शकलो असतो.”

माजी क्रिकेटपटू योगराज सिंग पुढे म्हणाले, “आपण लॉजिकवर बोलूया. जेव्हा जडेजा फलंदाजी करत होता तेव्हा तोच गोलंदाज आणि तीच विकेट होती. तो एकापाठोपाठ एक षटकार आणि चौकार मारत होता आणि हा भाऊ (धोनी) तू मार, पांड्या को बोले हे तू मार. धोनीने दोन फलंदाजांना बाद केले. जर जडेजा येऊन खेळू शकला असता आणि तोही खेळला तर आम्ही ४८ षटकांतच सामना जिंकला असता. त्याने मुद्दामहून संथ फलंदाजी केली. त्याला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला विश्वचषक जिंकू नये असे वाटत होते म्हणूनच तो खराब खेळला.”

हेही वाचा: Asian Athletics Championships 2023: एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपची धुरा हनुमानावर, अधिकृत शुभंकर म्हणून केली घोषणा

पुढे योगराज म्हणाले, “अजूनही तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना १५ चेंडूत ४० धावा, २० चेंडूत ५० धावा करतो. दरम्यान, ती जबरदस्त षटकार आणि चौकारही मारतो. तुम्ही चेन्नई सुपर किंग्ससाठी असं खेळू शकतो पण न्यूझीलंडविरुद्ध २०१९च्या उपांत्य फेरीतील सामन्यात जाणूनबुजून वाईट खेळला. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही कर्णधाराने भारतासाठी विश्वचषक उंचवावा, अशी त्यांची इच्छा नव्हती.”

हेही वाचा: IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत यशस्वी जैस्वाल करणार टीम इंडियात पदार्पण, रोहितची घोषणा; जाणून घ्या प्लेईंग ११

उपांत्य फेरीतील त्या सामन्यात धोनी ४९व्या ओव्हरमध्ये ५० धावांवर रनआउट झाला होता. तळाच्या फलंदाजांना २४ धावा करायच्या होत्या, पण ते अपयशी ठरले. किवी संघाने दिलेल्या २३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ २२१ धावांवर गारद झाला. त्यामुळे या रोमांचक सामन्यात भारतीय संघाला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि त्यामुळे टीम इंडियाचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. त्यानंतर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.