Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce Rumours: भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. चहल आणि धनश्री दोघेही एकमेकांपासून वेगळे होणार आहेत, अशी चर्चा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे रंगली आहे. आता या चर्चेदरम्यान चहल आणि धनश्रीने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर युझवेंद्रने धनश्रीबरोबरचे सर्व फोटो हटवले आहेत. त्यानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे होणार असल्याच्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. दुसरीकडे घटस्फोटाबाबत चहल आणि धनश्रीकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.

हेही वाचा – IND vs AUS: “ओए कॉन्टास, काय झालं रे..?” यशस्वी जैस्वालने कॉन्स्टासला चिडवलं, चुकीचं नाव घेत अशी घेतली फिरकी; VIDEO व्हायरल

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या जोडप्याच्या जवळच्या सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, घटस्फोटाच्या अफवा खऱ्या आहेत. ते अधिकृतपणे मान्य होण्याआधी काही वेळ बाकी आहे. त्यांच्या विभक्त होण्याचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, परंतु हे स्पष्ट आहे की या जोडप्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – IND vs AUS: ऋषभ पंतने वादळी अर्धशतकासह घडवला इतिहास, ऑस्ट्रेलियात ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

याआधीही चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाची बरीच चर्चा झाली होती. सोशल मीडियावर चहल आणि धनश्रीचं नातं चर्चेचा विषय ठरला आहे. २०२३ मध्ये धनश्री वर्माने पती युझवेंद्रचे आडनाव ‘चहल’ तिच्या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवरून काढले होते. त्यानंतर घटस्फोटाच्या अफवांना वेग आला होता. युझवेंद्रने एक क्रिप्टिक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केल्यानंतर हा बदल पाहायला मिळाला होता. चहलच्या या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं होतं की, “एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे.” मात्र, त्यावेळी क्रिकेटरने घटस्फोटाच्या बातम्यांना अफवा असल्याचे म्हटले होते आणि चाहत्यांना अफवांवर लक्ष देऊ नये असे सांगितले होते.

हेही वाचा – IND vs AUS: विराट कोहलीचा बाद होताच सुटला संयम, झेलबाद झाल्याचे पाहताच स्वत:वरच संतापला अन्… VIDEO व्हायरल

धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल यांचे ११ डिसेंबर २०२० रोजी लग्न झाले. झलक दिखला जा सीझन ११ मध्ये असताना, कोरिओग्राफर धनश्रीने त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले होते की, “लॉकडाऊनच्या काळात क्रिकेट सामने नव्हते आणि सर्व क्रिकेटर्स घरी बसून निराश झाले होते. त्याच दरम्यान, एके दिवशी युजीने ठरवलं की त्याला डान्स शिकायचा आहे. त्याने सोशल मीडियावर माझ्या डान्सचे व्हिडिओ पाहिले आणि त्यावेळी मी डान्स शिकवत होती आणि त्याने माझा विद्यार्थी होण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला. मी त्याला शिकवायला तयार झाले आणि इथूनच आमच्या नात्याची सुरूवात झाली.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuzvendra chahal and dhanashree verma unfollow each other on instagram indian cricketer delete all pics divorce rumorus bdg