Yuzvendra Chahal equaled Adil Rashid’s embarrassing record in T20 cricket: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहल गेल्या काही काळापासून संघात आणि बाहेर आहे. युजी वेस्ट इंडिज दौऱ्यावर एकदिवसीय संघाचा भाग होता, पण तिन्ही सामन्यांमध्ये त्याला बेंचवर बसावे लागले. यानंतर टी-२० ची पाळी आली, जिथे तो सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो, तिथे त्याने जोरदार सुरुवात केली. या दौऱ्यातील पहिल्याच चेंडूवर चहलने विकेट घेतली. त्यानंतरही त्याच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चहलच्या नावावर लाजिरावाणा विक्रम नोंदवला गेला –

त्याने वेस्ट इंडिजचा उपकर्णधार आणि घातक फलंदाज काईल मायर्सला एलबीडब्ल्यू बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर त्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने वेस्ट इंडिजचा दुसरा सलामीवीर ब्रॅंडन किंगलाही चकवले आणि त्यालाही एलबीडब्ल्यू केले. इथून तो वरचढ ठरेल असे वाटत होते, पण तसे होऊ शकले नाही. त्याच षटकात तो येताच निकोलस पूरनने त्याला एक चौकार आणि एक षटकार ठोकत १० धावा ठोकल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात त्याने चांगली गोलंदाजी केली आणि फक्त ५ धावा दिल्या. यानंतर तिसऱ्या षटकात चहलने रोव्हमन पॉवेलकडून षटकार खाल्ला पण त्याने केवळ ८ धावा दिल्या.

असे करत चहलने ३ षटकात २४ धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने दोन मारले आणि त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. युजीने आतापर्यंत ७६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १६७४ चेंडू टाकले आहेत आणि एकूण ११९ षटकार खाल्ले आहेत. तो आता आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार खाणारा संयुक्त दुसरा गोलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीदची बरोबरी केली.

टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज –

१२९ – ईश सोधी, न्यूझीलंड (२०३५ चेंडू)
११९ – युजवेंद्र चहल, भारत (१६७४ चेंडू)
११९ – आदिल रशीद, इंग्लंड (१९८८ चेंडू)
११७ – टीम साऊदी, न्यूझीलंड (२३३५ चेंडू)
१०८ – शाकिब अल हसन, बांगलादेश (२५३५ चेंडू)

युजवेंद्र चहलच्या विश्वचषक खेळण्यावर सस्पेन्स –

युजवेंद्र चहल गेल्या काही काळापासून भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. गतवर्षीही त्याला टी-२० विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याआधी तो २०२१ च्या टी२० विश्वचषकातही संघाचा भाग नव्हता. अशा परिस्थितीत आगामी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये त्याच्या खेळण्याबाबत सस्पेंस आहे. चहलने २०१६ मध्ये भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, परंतु तेव्हापासून त्याने केवळ ७२ सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर १२१ एकदिवसीय विकेट्स आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर त्याला वनडेमध्येही संधी मिळाली नाही. आता तो विश्वचषक संघात स्थान मिळवू शकतो की नाही हे पाहावे लागेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuzvendra chahal equaled adil rashids embarrassing record in t20 cricket vbm
Show comments