भारताचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल सतत काहीना काही कारणामुळे चर्चेत असतो. विशेषत: त्याच्या ‘कुल’ वागण्यामुळे तर सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या क्रिकेट स्पर्धेमध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली. चहलने आयपीएलच्या १५व्या हंगामात २७ बळी घेऊन पर्पल कॅप आपल्या नावे केली. आयपीएल संपल्यापासून सर्वच भारतीय खेळाडू आराम करत आहेत. काहीजण कुटुंबाला घेऊन बाहेरच्या देशामध्ये फिरायला गेले आहेत तर काहीजण घरीच आराम करत आहे. युझवेंद्र चहलने मात्र सलूनमध्ये जाण्याला प्राधान्य दिले आहे. चहलने नुकतेच आपले केस कापून घेतले आहेत. त्याच्या या नवीन हेअरस्टाईलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून काही युजर्सनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युझवेंद्र चहलने प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आलीम हकीमच्या सलूनमध्ये हेअरकट करून घेतला आहे. आलीम हकीम हा मुंबईतील प्रसिद्ध हेअरस्टाइलिस्ट आहे. बॉलिवूड कलाकार, प्रसिद्ध व्यक्ती यांच्याशिवाय एमएस धोनी, विराट कोहली, हार्दिक पांड्या यांच्यासारखे क्रिकेटपटू त्याचे ग्राहक आहेत. आलीम हकीमने स्वत: युझवेंद्र चहलचा फोटो शेअर केला आहे. ‘युझवेंद्र चहलसाठी फ्रेश हेअर समर कट’, अशा कॅप्शनसह त्याने चहलचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकले आहेत.

हे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्यावर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. काहींनी चहलला ट्रोल केले आहे. ‘असे केस कापण्याचा काय उपयोग आहे? आंघोळ केल्यानंतर ते पूर्वीसारखेच होतील’, अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर, काहींनी कमेंटमध्ये लिहिले की ‘५० रुपयांत गावातील सलूनमध्ये यापेक्षा चांगली कटिंग करून मिळते.’