Yuzvendra Chahal chance to break Shahid Afridi’s record: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेतील चौथा सामना शनिवारी होणार आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंडवर खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. आता टीम इंडिया मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. या सामन्यादरम्यान भारतीय फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडू शकतो. युजवेंद्र चहल १०० टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण करण्याच्या जवळ आहे.
युजवेंद्र चहल सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याच्या बाबतीत सध्या ११व्या क्रमांकावर आहे. त्याने ७८ सामन्यात ९५ बळी घेतले आहेत. चहलला १०० बळी पूर्ण करण्यासाठी ५ बळींची गरज आहे. सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तो आफ्रिदीला मागे सोडू शकतो. आफ्रिदीने ९९ सामन्यात ९८ विकेट घेतल्या आहेत. त्याने चार विकेट घेतल्यास आफ्रिदी मागे टाकण्यात यशस्वी होईल.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम सध्या शाकिब अल हसनच्या नावावर आहे. त्याने ११७ सामन्यात १४० विकेट्स घेतल्या आहेत. टीम साऊदी दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा गोलंदाज सौदीने १०७ सामन्यात १३४ विकेट घेतल्या आहेत. राशिद खान तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ८२ सामन्यात १३० विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय फिरकीपटू चहलबद्दल बोलायचे, तर तो सध्या ११व्या क्रमांकावर आहे. तो सर्वाधिक टी-२० विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे. भुवनेश्वर कुमारने ८७ सामन्यात ९० विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा – अंबाती रायुडूचा मोठा निर्णय! सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रिओट्ससोबत केला करार, ‘या’ स्पर्धेत होणार सहभागी
वेस्ट इंडिजचा टी-२० संघ –
वेस्ट इंडिज: रोव्हमन पॉवेल (कर्णधार), काइल मेयर्स (व्हीसी), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेद मॅककॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ आणि ओशन थॉमस.
भारतीय संघ टी-२० संघ –
भारत : इशान किशन (यष्टीरक्षक), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.