जगभरात सध्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हजारो लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे.

धोनीने जे केलं, तेच विराट, रोहितने करावं – गंभीर

करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. घरबसल्या काही क्रिकेटपटू पूर्णपणे आपल्या कुटुंबाला वेळ देत आहेत, काही क्रिकेटपटू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत तर काही टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल टिकटॉकवर बराच अ‍ॅक्टिव्ह आहे. अनेकदा तो ट्रोलदेखील झाला आहे. पण सध्या मात्र तो ट्विटरवरील एका फोटोमुळे चर्चेत आला आहे.

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला. त्या फोटोवर त्याने एक छान कॅप्शन दिलं आहे. एका दिग्गज खेळाडूकडून स्टंपच्या मागून तिल्ली असं नाव ऐकणं सध्या मी ‘मिस’ करतोय असं चहलने त्या फोटोच्या कॅप्शन मध्ये लिहिलं आहे. चहलला धोनी ‘तिल्ली’ म्हणजेच काडेपेटीच्या खोक्यातील एक काडी अशी हाक मारतो. चहल गोलंदाजी करताना धोनी जेव्हा किपरच्या भूमिकेत असायचा, तेव्हा ‘तो’ चहलला तिल्ली असं हाक मारायचा ते सध्या चहलला ऐकायला मिळत नाहीये म्हणून त्याने धोनीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

मुरली विजयसोबत डिनर डेटवर जाण्यासाठी एलिस पेरीने ठेवली एक अट

दरम्यान, युजवेंद्र चहलच्या टीकटॉक व्हिडीओची विराटनेही खिल्ली उडवली आहे. “अरे, तू जा आणि त्याचे (चहलचे) टीक-टॉक व्हिडीओ बघ. तुझा विश्वासच बसणार नाही की हा माणूस २९ वर्षांचा आहे आणि तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. तो खरंच विदुषक (विनोदी स्वभावाचा) आहे”, असे विराटने डीव्हिलियर्सला सांगितले होते. तर ख्रिस गेलने तर चहलला ‘आता मी ‘टीकटॉक’लाच तुला ब्लॉक करायला सांगतो”, असे म्हटले होते.

 

Story img Loader