निदहास चषक स्पर्धेत अंतिम फेरीत बांगलादेशवर मात करुन भारताने स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. भारतामध्ये परतत असताना विमानप्रवासात काही खेळाडू इतके दमले की त्यांनी सिटवरच चादर ओढून झोपण पसंत केलं. थोड्याच वेळात या दोन क्रिकेटपटूंचा घोरण्याचा आवाज संपूर्ण विमानात ऐकायला यायला लागला. भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने आपल्या सहकाऱ्यांचं घोराख्यान इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून समोर आणलं आहे.

अवश्य वाचा – कार्तिकने तो षटकार खेचला नसता तर माझं काही खरं नव्हतं – विजय शंकर

चहलने पोस्ट केलेल्या फोटोमधले दोन भारतीय खेळाडू हे अष्टपैलू सुरेश रैना आणि ऋषभ पंत असल्याचं समोर आलंय. जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघाने तात्काळ विमानतळावर जाऊन भारताकडे जाणारं विमान गाठलं. अंदाजे आठवडाभर चाललेल्या या स्पर्धेमुळे खेळाडू चांगलेच थकले होते. यामुळेच रैना व पंत यांनी चादर घेत झोपून जाण पसंत केलं. मात्र गाढ झोप लागल्यानंतर त्यांचं घोरणं चहलने इन्स्टाग्राम पोस्टमधून जगभरासमोर आणलं आहे.

अंतिम सामन्यात विजयासाठी भारताला शेवटच्या दोन षटकांमध्ये ३४ धावांची गरज होती. यावेळी दिनेश कार्तिकने ८ चेंडूत नाबाद २९ धावांची खेळी केली. कार्तिकच्या या धडाकेबाज खेळीमुळे भारताने बांगलादेशवर ४ गडी राखून मात केली.

अवश्य वाचा – जाणून घ्या दिनेश कार्तिक सामन्याआधी काय म्हणाला होता…

Story img Loader