Yuzvendra Chahal Dropped From World Cup 2023: बीसीसीआयने वर्ल्ड कपसाठी १५ सदस्यीय टीम इंडियाची निवड केली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा केली. या संघात युजवेंद्र चहलची निवड झालेली नाही. या लेगस्पिनरला १५ सदस्यीय संघाचा भाग बनवण्यात आले नाही. मंगळवारी जेव्हा संघाची घोषणा करण्यात आली, तेव्हा कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची फिरकीपटू म्हणून निवड करण्यात आली.

युजवेंद्र चहल संघाचा भाग असायला हवे होता, असे अनेक माजी खेळाडूंनी सांगितले. लेग-स्पिनर म्हणून तो संघाच्या गोलंदाजीत विविधता आणतो. मात्र, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचे मत वेगळे होते. आगरकर म्हणाले की, अनेक खेळाडूंच्या नावांवर चर्चा झाली पण शेवटी आम्ही १५ खेळाडू निवडले जे आम्हाला योग्य संतुलन देतात.

marathi actor atul kulkarni
वेडी आशा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
KL Rahul Statement on Sanjiv Goenka Animated Chat in IPL 2024 loss Said Wasn’t the nicest thing Ahead
KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य
yogi Adityanath batenge to katenge
‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथ यांची घोषणा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Gautam Gambhir has challenged Australia ahead Border-Gavaskar Trophy
Gautam Gambhir : ‘कोणत्याही प्रकारची खेळपट्टी तयार करा, आम्ही…’, गौतम गंभीरने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला दिले आव्हान

मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, “तथापि, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यात अनेक साम्य आहेत. पण त्याच्या येण्याने आमच्या फलंदाजीला समतोल आणि खोली मिळते. यासोबतच कुलदीप यादवही डाव्या हाताच्या फलंदाजाकडून चेंडू बाहेर काढतो. अशा परिस्थितीत आम्ही सर्व पैलू लक्षात घेऊन निवड केली आहे.”

हेही वाचा – World Cup 2023: “…ये सब सवाल मत पूछना”; ‘हा’ प्रश्न विचारताच भर पत्रकार परिषदेत संतापला रोहित शर्मा, पाहा VIDEO

इंडिया डॉट कॉमने याबाबत चहलशी बोलण्याचा प्रयत्न केला असता. मात्र, चहलने यावर कोणतेही उत्तर देण्यास नकार दिला. तो म्हणाला, ”काही हरकत नाही, कोणतीही मुलाखत नको.” संघात नसल्याबद्दल दु:ख होणे साहजिकच आहे. चहल हा टीम इंडियासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. पण निवडकर्त्यांनी त्याला १५ सदस्यीय संघात समाविष्ट केलेले नाही.

हेही वाचा – Asia Cup 2023: ”… हे फक्त जय शाहच स्पष्ट करू शकतात”; भारत-पाक सामना रद्द झाल्यानंतर नजम सेठींनी एसीसीच्या अध्यक्षावर साधला निशाणा

२०१९ च्या विश्वचषकात त्याने ८ सामन्यात १२ विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये ५१ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. कुलदीप यादवसोबतची त्याची जोडी खूपच खास होती. चहलने या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये फक्त २ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

विश्वचषकासाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.