कुलदीप यादवच्या जागी तिसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघात जागा मिळालेल्या युझवेंद्र चहलने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. चहलने ऑस्ट्रेलियाच्या 6 गड्यांना माघारी धाडत, ऑस्ट्रेलियात वन-डे सामन्यात सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. चहलने भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे. 2004 साली मेलबर्नच्या मैदानावर अजित आगरकरने 42 धावांमध्ये 6 गडी घेतले होते. यानंतर आज 15 वर्षांनी चहलने याच कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याचसोबत चहलने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या लेगस्पिनर्सच्या यादीतही स्थान पटकावलं आहे.

चहलने केलेल्या माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 230 धावांमध्ये आटोपला. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारने 2-2 बळी घेत चहलला मोलाची साथ दिली.