भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत अफवा पसरल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की दोघेही एकत्र एका छताखाली राहत आहेत. याशिवाय हे दोघेही घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. चहल आणि धनश्रीने घटस्फोटाच्या अफवांवर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही, पण दोघेही सोशल मीडियावर एकमेकांना टोमणे मारताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चहलने आज गुरूवारी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने देवाने कायमच त्याला वाचवलं असल्याचे त्याने म्हटलं आहे. चहलच्या या इन्स्टाग्राम स्टोरीला धनश्रीने देखील उत्तर दिलं आहे. तिनेही चहलने स्टोरी पोस्ट केल्यानंतर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.

युझवेंद्र चहलने गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्याने लिहिले, ‘मी आकड्यांमध्ये मोजूही शकत नाही इतक्या वेळा देवाने मला वाचवलं आहे. त्यामुळे मला फक्त आठवतं की मी देवाने कितीदा मला तारलं आहे आणि काही वेळेस तर देव माझ्यासोबत आहे हे मला माहितदेखील नव्हतं, मला माहीत नसतानाही मला साथ दिल्याबद्दल देवाचे आभार.’

चहलच्या इन्स्टाग्राम स्टोरीनंतर सुमारे तासाभराने धनश्रीने इन्स्टाग्रामवर देवाशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘तणावातून भाग्यवान होण्यापर्यंत. देव आपल्या तणावाचे आनंदात रूपांतर कसे करतो हे किती आश्चर्यकारक आहे? जर तुम्ही आज एखाद्या गोष्टीबद्दल तणावात असाल, खूप विचारात पडला असाल तर तुमच्याकडे एक पर्याय आहे हे लक्षात ठेवा, तुम्ही एकतर टेन्शन घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या सर्व चिंता देवाला अर्पण करू शकता आणि प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करू शकता. देव तुमच्या भल्यासाठी सारं काही करू शकतो यावर विश्वास ठेवण्यात एक वेगळंच बळ मिळत.’’


युझवेंद्र चहलची इन्स्टाग्राम स्टोरी (फोटो-@Yuzvendrachahal)
धनश्री वर्माची इन्स्टाग्राम स्टोरी (फोटो-@Dhanashreeverma)

धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहलने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. याशिवाय दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एकमेकांचे अनेक फोटोही डिलीट केले आहेत. मात्र, दोघांनीही या अफवांवर अधिकृतपणे काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. चहलने जानेवारीमध्ये एक पोस्ट शेअर करत सांगितले होते की अफवांवर चर्चा करू नको, यामुळे मला माझ्या कुटुंबाला याचा त्रास होतो.