Yuzvendra Chahal insta story viral during divorce rumours : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी, अभिनेत्री-कोरियोग्राफर धनश्री वर्मा लग्नाच्या जवळपास पाच वर्षानंतर वेगळे होत असल्याची चर्चा आहे. इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. याशिवाय, काही रिपोर्ट्सनुसार, चहलने धनश्रीसोबतचे सर्व फोटो त्याच्या अकाऊंटवरून काढून टाकले आहेत, ज्यामुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवा आणखी वाढल्या आहेत. दरम्यान, आता युजवेंद्र चहलने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिपोर्ट्सनुसार, युजवेंद्र आणि धनश्री गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. २०२३ मध्ये धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून ‘चहल’ नाव काढून टाकले होते, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या अटकळ वाढल्या. त्याच वेळी, चहलने ‘नवीन जीवन लोड होत आहे’ अशी एक पोस्ट केली होती. त्यामुळेही अटकळ बांधली गेली. मात्र, त्यावेळी चहलने या अफवा फेटाळून लावत चाहत्यांना खोटी माहिती पसरवू नका असे आवाहन केले होते.

युजवेंद्र चहलने शेअर केली इन्स्टा स्टोरी –

युजवेंद्र चहलने शनिवारी इन्स्टावर एक स्टोरी शेअर करताना लिहिले की, “कठोर मेहनत लोकांचे चारित्र्य प्रकट करते. तुम्हाला तुमचा प्रवास माहित आहे. तुमची वेदना तुम्हाला माहीत आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय केले हे तुम्हाला माहीत आहे. जगाला माहीत आहे. तुम्ही उच्च आहात. तुम्ही तुमच्या वडील आणि आईला अभिमान वाटावा यासाठी तू खूप घाम गाळला आहे. त्यामुळे नेहमी एका अभिमानास्पद मुलाप्रमाणे खंबीर राहा.”

हेही वाचा – IND vs AUS : बोलंडच्या विकेट्सच्या पंचकसमोर पंतचे अर्धशतक पडले फिके, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मिळाले १६२ धावांचे लक्ष्य

घटस्फोटाच्या अफवा कशा पसरल्या?

या जोडप्याने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले होते, त्यानंतर त्यांच्या विभक्त झाल्याच्या अफवा पसरू लागल्या. चहलने त्याच्या अकाऊंटवरुन धनश्रीसोबतचे सर्व फोटो हटवले, ज्यामुळे घटस्फोटाच्या अफवांना आणखी हवा मिळाली. जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते काही महिन्यांपासून वेगळे राहत होते. मात्र, चहल किंवा धनश्री या दोघांनीही या अफवांवर मौन सोडलेले नाही. या दोघांचे २०२० मध्ये लग्न झाले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuzvendra chahal shares cryptic instagram story amid divorce rumours with dhanashree verma vbm