Yuzvendra Chahal spotted with mystery girl Photo Viral : क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा विभक्त होणार असल्याची चर्चा आहे. २०२० मध्ये लग्न झालेल्या या जोडप्यामधील घटस्फोटाची अटकळ, तेव्हा तीव्र झाली, जेव्हा दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले. चहलने पत्नीसोबतचे फोटोही इन्स्टावरुन हटवले आहेत. मुंबईतील एका हॉटेलमध्ये चहल एका अनोळखी महिलेसोबत दिसल्याच्या बातमीने आणखीनच चर्चांना उधाण आले आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

द न्यू इंडियनमधील वृत्तानुसार, युजवेंद्र चहल फोटोग्राफर्सना पाहून चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होता. पण या महिलेसोबतचा त्याचा फोटो ऑनलाइन लीक झाला. फोटोत, चहल पांढरा टी-शर्ट आणि बॅगी जीन्समध्ये होता आणि त्याचा चेहरा झाकलेला होता. स्वेटशर्ट आणि काळ्या जीन्समध्ये ही महिला घाबरलेली दिसत होती. चहल ज्या महिलेसोबत दिसला तिची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेने घटस्फोटाच्या अफवांना आणखी खतपाणी घातले आहे.

Tirupati Stampede Latest Updates| Stampede at Tirupati bairagipatteda token counter
Tirupati Stampede : तिरुपतीच्या चेंगराचेंगरीत कायमची ताटातूट, व्हायरल व्हिडिओमुळे पतीला समजली पत्नीच्या मृत्यूची बातमी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Dhanashree Verma break silence on Divorce Rumours
Dhanashree Verma : युजवेंद्र चहलबरोबर घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनश्री वर्माचे ट्रोल्सना चोख उत्तर; म्हणाली, “माझे मौन हे…”
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Spotify logo
Spotify : “कर्मचाऱ्यांना मुलांसारखे वागवू शकत नाही”, ‘Work From Anywhere’ वर स्पॉटिफाय ठाम
1.5 lakh Pakistan government jobs
एका झटक्यात गेल्या दीड लाख सरकारी नोकऱ्या; पाकिस्तान अभूतपूर्व संकटात, नेमकं घडतंय तरी काय?
Satya Nadella Praised Sharad Pawar for Agricultural Development Trust Baramati
Microsoft चे सीईओ सत्या नडेलांनी केलं कौतुक, शरद पवारांनी मानले आभार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local Train Shocking video Womans Obscene Dance
मुंबई लोकलमध्ये तरुणीने ओलांडली मर्यादा! अश्लील कृत्य पाहून प्रवासी संतापले; VIDEO व्हायरल

धनश्रीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये काय म्हटलं?

धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. तिने ट्रोलर्सकडून चारित्र्यहनन केले जात असल्याचा आरोप केला आहे. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणाली की, “गेले काही दिवस माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी खूपच कठीण गेले आहेत. निराधार लिखाण, गोष्टीची सत्यता न तपासणे आणि द्वेष पसरवणाऱ्या बिना चेहर्‍यांच्या ट्रोल्सकडून केले जाणारे माझ्या प्रतिष्ठेची चारित्र्यहनन हे खरोखर अस्वस्थ करणारे आहे”.

हेही वाचा – चॅम्पियन्स करंडकाची तयारी पाकिस्तानकडून संथगतीने; बहुतेक केंद्रांचे नूतनीकरण अपूर्णच

धनश्री तिच्या पोस्टमध्ये म्हणाली, “माझे नाव आणि प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी मी अनेक वर्षे कठोर परिश्रम घेतले आहेत. माझे मौन हे दुर्बलतेचे नाही तर ताकदीचे लक्षण आहे. नकारात्मकता ऑनलाइन सहज पसरवली जात असताना, इतरांना पुढे घेऊन जाण्यासाठी करुणा आणि धैर्याची गरज असते. मी माझ्या सत्यावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि मा‍झ्या मूल्यांना धरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. सत्य हे कोणत्याही समर्थनाशिवाय निश्चल राहते”.

हेही वाचा – रोहित, विराटच्या समावेशाची शक्यता; चॅम्पियन्स करंडकासाठी राहुल, शमी, जडेजाबाबत संदिग्धता

नेमक काय सुरू आहे?

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, युजवेंद्र आणि धनश्री गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. २०२३ मध्ये धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून ‘चहल’ नाव काढून टाकले होते. काही दिवसांपूर्वी युजवेंद्र चहलने देखील इन्स्टावर एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये क्रिकेटर म्हणाला होता की, “कठोर मेहनत लोकांचे चारित्र्य प्रकट करते. तुम्हाला तुमचा प्रवास माहित आहे. तुमची वेदना तुम्हाला माहीत आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय केले हे तुम्हाला माहीत आहे. जगाला माहीत आहे. तुम्ही उच्च आहात. तुम्ही तुमच्या वडील आणि आईला अभिमान वाटावा यासाठी तू खूप घाम गाळला आहे. त्यामुळे नेहमी एका अभिमानास्पद मुलाप्रमाणे खंबीर राहा.”

Story img Loader