Ravindra Jadeja on Yuzi Chahal: युजवेंद्र चहलची सध्या मर्यादित षटकांमध्ये सर्वोत्तम लेगस्पिनर्समध्ये गणना केली जाते. मात्र, चहलला टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये सध्या स्थान मिळत नाही कारण टीममध्ये त्याचाच सहकारी कुलदीप यादवचा समावेश केला आहे. यामुळेच चहल सध्या बाकावर बसलेला दिसतो. पण चहल मैदानात असो की बाहेर, तो कायम चर्चेत येतो. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चहलला प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळाले नाही, पण हा लेगस्पिनर पुन्हा चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चहल त्याच्या मस्तमौला शैलीसाठी ओळखला जातो. संघातील खेळाडूंसोबत तो खूप धमाल करतो. मात्र, दुसऱ्या ‘वन डे’त चहलचे वेगळेच हावभाव पाहायला मिळाले. चहल हा त्याचा सहकारी खेळाडू रवींद्र जडेजाकडे बघत त्याला रागाने काहीतरी म्हणत असल्याचे पाहायला मिळाले. टीम इंडिया बार्बाडोसमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरी वन डे खेळत होती, त्याच दरम्यान पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला होता. यावेळी, कॅमेरा युजवेंद्र चहलच्या दिशेने गेला, जिथे त्याने केलेली कृती मोठ्या पडद्यावर झळकली. सध्या त्याने ही केलेली मजेशीर कृती सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

हेही वाचा: Kapil Dev: सुनील गावसकरांचे नाव घेत कपिल देव यांनी टीम इंडियावर सडकून केली टीका; म्हणाले, “जास्त पैसा आला की…”

चहलने जडेजाला डोळे दाखवले

दुसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. संघाचे फलंदाज जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले नाहीत. रवींद्र जडेजा फलंदाजी करायला निघाला होता आणि पॅड घालून फलंदाजीला जाण्यासाठी जात असताना तो ड्रेसिंग रूमच्या पायऱ्यांजवळ उभा होता. त्याचवेळी चहल खालून वर येत होता. त्यानंतर जडेजा आणि चहल यांच्यात काहीतरी घडले.

हेही वाचा: IND vs WI: प्रशिक्षक राहुल द्रविडचा सूर्यकुमार यादवला अल्टिमेटम; म्हणाला, “मिळत असलेल्या संधीचा फायदा घ्या, अन्यथा…”

जडेजा हसत होता आणि चहल त्याच्याकडे रागाने पाहत आणखी त्याच्याजवळ सरकला आणि त्याला काहीतरी म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून जडेजाला हसू अनावर झाले आणि जडेजाने गंमतीने त्याचे गाल पकडले. व्हिडीओ मध्ये जडेजा चक्क त्याचा गालगुच्चा घेताना दिसत आहे. हे सर्व मजामस्तीत चालू होते. त्या व्हिडीओत हे पाहून चहल जडेजाला चेष्टेने त्रास देत आहे असे दिसून येते. चहल कायम त्याच्या मजामस्तीसाठी ओळखला जातो.

भारताचा सहा विकेट्सने पराभव झाला

दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा सहा विकेट्सने लाजीरवाणा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हा संघ ४०.५ षटकांत १८१ धावांत आटोपला. सलामीवीर इशान किशनने संघाकडून सर्वाधिक ५५ धावा केल्या. शुबमन गिलने ३४ धावांची खेळी केली. कर्णधार शाई होपच्या नाबाद ६३ आणि केसी कार्टीच्या नाबाद ४८ धावांच्या जोरावर विंडीजने हे लक्ष्य ३६.४ षटकांत चार गडी गमावून पूर्ण केले.