मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात दुसऱ्या दिवशी मुंबईने पकड मजबूत केली आहे. कौस्तुभ पवारच्या झुंजार शतकाच्या जोरावर मुंबईचा पहिला डाव ३०४ धावांमध्ये संपुष्टात आला. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर मध्य प्रदेशची ५ बाद १९१ अशी दुसऱ्या दिवसअखेर अवस्था आहे. कौस्तुभने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत १६ चौकारांच्या मदतीने नाबाद १११ धावांची खेळी साकारल्यामुळे मुंबईला पहिल्या डावात तीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. मध्य प्रदेशच्या ईश्वर पांडेने या वेळी तब्बल सहा बळी मिळवले.मध्य प्रदेशच्या संघाला चांगली सुरुवात करता आली नसली तरी सत्यम चौधरीच्या अर्धशतकाने त्यांना सावरले.
सत्यमने ११ चौकारांच्या मदतीने नाबाद ७३ धावांची संयमी खेळी साकारली. कर्णधार अजित आगरकरने या वेळी दोन बळी टिपले, तर संघात पुनरागमन करणाऱ्या झहीर खाननेही एक बळी मिळवला. 

Story img Loader