Zaheer Khan has been appointed as the coach of LSG : आयपीएल २०२५ साठी सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. मेगा ऑक्शनपूर्वी बीसीसीआय खेळाडू रिटेनशनचे नियम जाहीर करेल याचीही सर्वांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, लखनौ सुपर जायंट्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. एलएलजीने भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानला मेंटॉर नियुक्त केले आहे. एलएसजी फ्रँचायझींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानचे दीर्घ कालावधीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन झाले आहे. व्यावसायिक क्रिकेटला अलविदा केल्यानंतर एकेकाळी मुंबई इंडियन्सच्या क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालकपद भूषवणारा झहीर आता आगामी मोसमात लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) संघाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी पार पाडणार आहे. लखनौ संघाचा शेवटचा आयपीएल हंगाम अपेक्षेप्रमाणे राहिला नव्हता. त्यामुळे संघात मोठे बदल होणार हे अगोदरच स्पष्ट होते, ज्यावर झहीर खानच्या नियुक्तीने शिक्कामोर्तब झाला.

झहीर खानने २००८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. यानंतर २०१७ मध्ये शेवटचा खेळला. यानंतर झहीर खानने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तो २०१८ ते २०२२ पर्यंत मुंबई इंडियन्ससोबत राहिला. आता तो लखनौसाठी मार्गदर्शकाची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या आधी गौतम गंभीर या पदावर होता. गंभीर आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामील झाला. त्यांच्या जाण्यानंतर लखनौमध्ये गुरूची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे आता झहीर या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा – Zaheer Khan : झहीर गुरुजी देणार लखनौला शिकवणी; गौतम गंभीरच्या जागी नियुक्ती

कोचिंग स्टाफमध्ये कोणताही बदल होणार नाही –

लखनौच्या कोचिंग स्टाफबद्दल बोलायचे झाले, तर जस्टिन लँगर हे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत आहेत. अँडी फ्लॉवरच्या जागी तो आला. लान्स क्लुसनर आणि ॲडम व्होजेस हे संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. झहीरच्या आगमनानंतर कोचिंग स्टाफमध्ये कोणताही बदल होणार नाही. पण झहीर मेंटॉर होण्यासोबतच इतर जबाबदाऱ्या पार पाडणार आहे. ते प्लेअर-डेव्हलमेंट कार्यक्रमही आयोजित करू शकतात.

हेही वाचा – Ravichandran Ashwin : ‘तो निर्णय घेण्याचा अधिकार खेळाडूला…’, अश्विनचे ‘राईट टू मॅच’ आणि ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमावर मोठे वक्तव्य

झहीर खानची कारकीर्द राहिलीय दमदार –

झहीर खानच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर ती चमकदार होती. झहीरने १०० आयपीएल सामन्यात १०२ विकेट्स घेतल्या आहेत. या काळात केवळ १७ धावांत ४ विकेट्स घेणे ही सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. झहीरने भारतासाठी १७ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये १७ विकेट्स घेतल्या आहेत. झहीरने २०० एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत २८२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने टीम इंडियासाठी ३११ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zaheer khan has been appointed as the mentor of the lucknow super giants team ahead of ipl 2025 mega auction vbm