परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरीता सल्लागार समितीची क्लृप्ती
भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची निवड होणार हे जगजाहीर होते. पण शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली एकत्र आले तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, हा धोका वेळीच लक्षात घेत क्रिकेट सल्लागार समितीमधील एका माजी महान फलंदाजाने भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची सल्लागार म्हणून निवड केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वर्षभरापूर्वी शास्त्री यांचा संघाच्या संचालकपदाचा कार्यकाळ संपला होता. त्यांच्या कार्यकाळात कोहलीचे पाय जमिनीवर राहिले नव्हते. शास्त्री यांचा त्याला पूर्णपणे पाठिंबा होता. त्यामुळे कोहली आणि संघाला शिस्त लागावी, यासाठी क्रिकेट सल्लागार समितीने अनिल कुंबळे यांना मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले होते. पण कोहलीने आक्रमकपणे त्यांच्या योजनांचा बीमोड करायला सुरुवात केला आणि सरतेशेवटी त्यांना राजीनामा द्यावा लागला.
कोहली आता कुणालाही जुमानणार नाही, हे लक्षात घेऊन त्याच्या कलेने घ्यायचे सल्लागार समितीने ठरवले. त्यामुळे प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आणि शास्त्रींसाठी पायघडय़ा घातल्या गेल्या. या दरम्यानच्या काळात सल्लागार समितीने कोहलीशी संपर्क साधला होता. त्या वेळी शास्त्री यांच्या नावावर कोहली ठाम होता. पण सल्लागार समितीतील सौरव गांगुली विरोधात होता. पण सचिन तेंडुलकर व व्ही.व्ही. एस. लक्ष्मण यांनी गांगुलीची समजूत घातली. पण शास्त्री यांची निवड केली आणि संघात त्यांच्यासह कोहलीने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर काय करायचे, हा प्रश्न सल्लागार समितीपुढे होता. शास्त्री आणि कोहली एकत्र आल्यावर संघासह बीसीसीआयलाही डोईजड होऊ शकतात, हा धोका वेळीच ओळखून सल्लागार समितीमधील माजी महान क्रिकेटपटूने एक क्लृप्ती लढवली.
‘‘शास्त्री यांना गोलंदाजीची बाजू सांभाळण्यासाठी फक्त भरत अरुणच हवे होते, तशी त्यांनी ठामपणे मागणीही केली होती. पण सल्लागार समिताने त्यांची ही मागणी नाकारली. अरुण हे शास्त्री यांच्या मर्जीतले आहेत. म्हणजे पुन्हा संघाला धोका पोहोचू शकतो, हा विचार सल्लागार समितीने केला. त्यामुळे अरुण यांच्यावर एका अनुभवी व्यक्तीची नेमणूक करावी, जो संघातील वातावरण पारदर्शक ठेवील. त्याचबरोबर त्याच्या अनुभवामुळे कुणी त्याला विरोध करणार नाही. पण असा माजी खेळाडू त्यांना या पिढीतलाच हवा होता, या संघातील खेळाडूंबरोबर खेळलेल्या क्रिकेटपटूचा विचार सुरू झाला. त्या वेळी झहीरचे नाव माजी महान फलंदाजाने सल्लागार समितीमधील अन्य सदस्यांना सुचवले आणि झहीरची सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली,’’ असे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘भारताच्या गोलंदाजीचे सल्लागारपद आपल्याला मिळेल, असे झहीरला अपेक्षित नव्हते. त्याच्या निवडीमागचा विचार त्याला सल्लागार समितीने स्पष्ट केला आणि त्यानंतर झहीरने ही भूमिका स्वीकारली. त्यामुळे गोलंदाजांना मार्गदर्शन करण्याबरोबर संघातील वातावरण स्वच्छ ठेवण्याचे काम आता झहीरला करावे लागणार आहे.’’
रवी शास्त्री यांची भरत अरुणसाठी मोर्चेबांधणी
नवी दिल्ली : भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानला गोलंदाजीचे सल्लागारपद सोपवण्यात आले असले तरी भरत अरुण संघात असावेत, यासाठी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोर्चेबांधणी केली आहे.
गोलंदाजी प्रशिक्षकपदी अरुणच असावेत, अशी मागणी शास्त्री यांनी केली होती. पण ती मागणी क्रिकेट सल्लागार समितीने नाकारली. त्या वेळी जर मला अरुण देत नसाल तर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी द्यावा, असे शास्त्री यांना सांगत आपला आक्रमकपणा दाखवून दिला होता. यामधून सुवर्णमध्य काढण्यासाठी झहीर आणि राहुल द्रविड यांची सल्लागारपदी निवड करताना सल्लागार समितीने शास्त्री यांना विश्वासात घेतले नसल्याचे म्हटले जात आहे.
दुसरीकडे झहीरच्या मानधनाबाबत आणि त्याच्या उपलब्धतेबाबत अजूनही प्रश्नचिन्ह असल्याचे म्हटले जात आहे. पण अरुण संघात कायम राहावेत, यासाठी शास्त्री बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीशी चर्चा करणार आहेत.
‘‘शास्त्री आणि झहीर यांच्यामधील संबंध चांगले आहेत. पण त्यांना झहीरच्या उपस्थितीत अरुणही संघात हवे आहेत. त्यासाठी ते प्रशासकीय समितीशी चर्चा करणार आहेत. यासाठी झहीरने गोलंदाजांसाठी योजना आखाव्यात आणि अरुण यांनी त्याची अंमलबजावणी करावी,’’ असे शास्त्री यांचे म्हणणे असल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले आहे.