Zifro T10 2023 Mohammad Hafeez taking six wickets video viral: झिम्बाब्वेमध्ये आफ्रो टी१० लीग सुरू झाली आहे. या लीगमध्ये भारतासह जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होत आहेत. या स्पर्धेत शुक्रवारी जोहान्सबर्ग बफेलोज आणि बुलावायो ब्रेव्हज यांच्यात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद हाफीजने शानदार कामगिरी केली. गेल्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या या ४२ वर्षीय खेळाडूने आता आपल्या नावावर एक मोठा विक्रम केला आहे.
टी१० क्रिकेटच्या इतिहासात कधीही एकाही गोलंदाजाला एका सामन्यात ६ विकेट्स घेता आले नव्हते, पण हाफिजने असे करून इतिहास रचला आहे. या सामन्यात हाफीज जोहान्सबर्ग बफेलोज नेतृत्व करत होता. मोहम्मद हाफिजने २ षटकात ४ धावा देत ६ बळी घेतले. त्याच्या पहिल्याच षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर त्याने विकेट्स मिळवल्या. यानंतर त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर आणखी एक विकेट मिळाली. यानंतर हाफिजने आपल्या दुसऱ्या षटकात आणखी तीन बळी घेत इतिहास रचला आणि एकूण ६ बळी घेतले.
मोहम्मद हाफीजने रचला इतिहास –
जोहान्सबर्ग बफेलोजचा कर्णधार मोहम्मद हाफीजने आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला. त्याने फलंदाजीच्या जोरावर नाही तर गोलंदाजीच्या जोरावर बुलावायो ब्रेव्हजविरुद्ध १० धावांनी विजय मिळवून दिला. या कामगिरीनंतर टी१० लीगमध्ये एका सामन्यात ६ विकेट घेणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी वनिंदू हसरंगा, प्रवीण तांबे आणि मार्चंट देलंगे यांनी टी१० क्रिकेटमध्ये ५-५ विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा – IND vs WI 2nd Test: इशान किशनकडून झाली चूक, पण अजिंक्य रहाणेने चपळाईने घेतला सर्वात कठीण झेल, पाहा VIDEO
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जोहान्सबर्ग बफेलोज संघाने १० षटकांत ७ गडी गमावून १०५ धावा केल्या. मुशफिकर रहीमने सर्वाधिक ४६ धावा केल्या. याशिवाय टॉम बॅंटनने ३४ धावा केल्या. १०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सिकंदर रझाच्या बुलावायो ब्रेव्हस संघाला पराभूनत व्हावे लागले. बुलावायो ब्रेव्हसला मोहम्मद हाफीजच्या धोकादायक गोलंदाजीसमोर १० षटकांत ९ गडी गमावून केवळ ९५ धावा करता आल्या. त्यामुळे त्यांना १० धावांनी सामना गमवावा लागला.