Zimbabwe Cricket Board want to host Women T20 World Cup 2024 : महिला टी-२० विश्वचषक यंदा बांगलादेशमध्ये होणार आहे. मात्र, बांगलादेशातील सरकारविरोधी निदर्शनांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव टी-२० विश्वचषकाचे ठिकाण बदलले जाण्याची शक्यता आहे. महिला टी-२० विश्वचषक ३ ऑक्टोबरपासून आयोजित केला जाणार आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या महिला टी-२० विश्वचषकाच्या यजमानपदाचा दावा अशा एका देशाने केला आहे. ज्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. हा देश दुसरा कोणी नसून झिम्बाब्वे आहे.

झिम्बाब्वेला बऱ्याच काळापासून आयसीसीची यजमानपद मिळाले नाही –

झिम्बाब्वे हा यजमानपदासाठी प्रमुख पर्याय म्हणून पुढे आला आहे. युएईकडेही पर्याय म्हणून पाहिले जात आहे. मंगळवारी, २० ऑगस्ट रोजी आयसीसी बोर्ड याबाबत निर्णय घेऊ शकते.झिम्बाब्वेने गेल्या काही वर्षांत (२०१८ आणि २०२३) दोन एकदिवसीय विश्वचषक पात्रता फेरीचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यानंतर, झिम्बाब्वेने स्वतःला मोठ्या क्रिकेट स्पर्धांचे संभाव्य ठिकाण म्हणून स्थापित केले आहे. झिम्बाब्वेने २००३ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि केनियासह शेवटच्या वेळी विश्वचषकाचे आयोजन केले होते. तेव्हापासून झिम्बाब्वेसमोर अनेक आव्हाने आहेत. रॉबर्ट मुगाबे यांच्या राजवटीचा समावेश, अति चलनवाढ, ज्यामुळे त्यांना महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धांपासून दूर ठेवण्यात आले.

Sanjay Manjrekar comment created Controversy face the taunt of Mumbai lobby
‘उत्तरेकडील खेळाडूंकडे मी फारसे लक्ष…’, संजय मांजरेकर वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्रोल; चाहते म्हणाले, ‘मुंबई लॉबी…’
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Bangladesh super fan Tiger Robi claims he was assaulted by the Kanpur crowd on Day 1
Bangladesh Super Fan Beaten Up: कानपूर कसोटीदरम्यान बांगलादेशी चाहत्याला मारहाण? पत्रकार म्हणाले, “पहिल्या कसोटीतही त्याने सिराजला…”
pakistan beggars export in saudi
पाकिस्तानातून भिकाऱ्यांची निर्यात; सौदी अरेबिया प्रशासनाचं पित्त खवळलं, काय आहे प्रकरण?
India grandmaster chess player D Gukesh expressed that he did not even think about it during the chess Olympiad sport news
ऑलिम्पियाड स्पर्धेदरम्यान जगज्जेतेपदाच्या लढतीचा विचारही नाही -गुकेश
indus water treaty
Indus Water Treaty : भारताची पाकिस्तानला ६४ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ कराराबाबत नोटीस; उत्तरादाखल पाकिस्तान म्हणतो, “भारतही…”
indus water treaty
Indus Water Treaty: भारताने सिंधू जलवाटप कराराबाबत पाकिस्तानला बजावली नोटीस ; नेमकं प्रकरण काय?
sri lanka first presidential election after economic collapse
विश्लेषण : आर्थिक मंदीनंतर श्रीलंकेत पहिलीच अध्यक्षीय निवडणूक… कुणाची सरशी? भारताशी संबंधांवर परिणाम काय?

झिम्बाब्वे स्वत:ला यजमान म्हणून सिद्ध करण्यास उत्साह –

झिम्बाब्वेने अलिकडच्या वर्षांत क्रिकेट जगतात पुनरागमन केले आहे आणि आता महिला टी-२० विश्वचषक आयोजित करण्यास उत्सुक आहे. मात्र, झिम्बाब्वेचा महिला क्रिकेट संघ कधीही विश्वचषकात सहभागी झालेला नाही, आणि यंदाही स्पर्धेत सहभागी होणार नाही. असे असले तरी झिम्बाब्वेने नवीन यजमान म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास उत्साह दाखवला आहे. झिम्बाब्वे २०२६ मध्ये नामिबियासोबत पुरुष अंडर-१९ विश्वचषक आणि २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि नामिबियासोबत एकदिवसीय विश्वचषक सह-यजमान असेल. दरम्यान, झिम्बाब्वे क्रिकेट आणि स्थानिक सरकार व्हिक्टोरिया फॉल्स आणि मुतारे येथे काम करत आहेत.

हेही वाचा – Paris Olympics 2024 : विनेश फोगटपासून ते इमेन खलिफपर्यंत… पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘हे’ पाच मोठे वाद राहिले चर्चेत

झिम्बाब्वेमध्ये का आयोजन केले जाऊ शकते?

सध्या, झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब आणि बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब २०२४ महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संभाव्य यजमान म्हणून मैदानात उतरत आहे. या मैदानांवर नुकतेच २०२३ च्या विश्वचषक पात्रता सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. ऑक्टोबरमधील झिम्बाब्वेचे हवामान देखील या स्पर्धेसाठी अनुकूल मानले जाते, कारण त्यावेळ देशात अधिक गरम असते आणि पावसाची शक्यता कमी असते.

हेही वाचा – Vinesh Phogat : ‘देव तुला सद्बुद्धी देवो…’, मेहुणा पवन सरोहा विनेशवर का संतापला? तर बहीण गीता म्हणाली, ‘कर्माचीच फळं…’

भारत आणि श्रीलंकेने हवामानामुळे यजमानपद न भूषवण्याचा निर्णय घेतला आहे. झिम्बाब्वेला आशा आहे की त्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेचा खर्च यूएईच्या तुलनेत कमी असेल. यामुळे अंतिम निर्णयात त्यांना फायदा मिळू शकेल. झिम्बाब्वेची क्षमता पाहता, १०,००० प्रेक्षक क्षमता असलेल्या ठिकाणी त्यांना चांगली गर्दी खेचण्याची संधी आहे, ज्याचा एक महत्त्वपूर्ण फायदा होऊ शकतो.