बुलावायो येथे आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. पण हा सामना सुरू होण्यापूर्वीच या सामन्यात एक इतिहास रचला गेला आहे. २७ वर्षीय खेळाडू जोनाथन कॅम्पबेलने या सामन्यातून पदार्पण केले. या खेळाडूच्या पदार्पणाची खास गोष्ट म्हणजे जोनाथन कॅम्पबेल त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यातच संघाचे कर्णधारपदही मिळवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी करणारा जोनाथन कॅम्पबेल हा दुसरा खेळाडू आहे. याआधी, नील ब्रँड पदार्पणाच्या कसोटीतच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बनला होता. २०२३ मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध संघाचे नेतृत्व केले होते.

कोण आहे जॉनथन कॅम्पबेल?

जोनाथन कॅम्पबेलचे वडीलही झिम्बाब्वेचे कर्णधार राहिले आहेत. जोनाथन हा माजी क्रिकेटपटू ॲलिस्टर कॅम्पबेल यांचा मुलगा आहे. ॲलिस्टर कॅम्पबेलने झिम्बाब्वेसाठी ६० कसोटी आणि १८८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या डावखुऱ्या फलंदाजाने भारताविरुद्ध शतकही ठोकले आहे. जोनाथन कॅम्पबेलच्या वडिलांनी कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी २०००मध्ये भारताविरुद्ध शतक झळकावले होते. त्या सामन्यात सचिन तेंडुलकरही भारतीय संघाचा भाग होता.

जोनाथन कॅम्पबेलने गेल्या वर्षीच झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जोनाथन कॅम्पबेलने ९ टी-२० सामन्यांमध्ये १५ पेक्षा जास्त सरासरीने १२३ धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ४५ सामन्यांमध्ये १९१३ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३२.४२ इतकी आहे. जोनाथन कॅम्पबेलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 4 शतकं झळकावली आहेत. आता जोनाथन झिम्बाब्वेच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधारही बनला आहे.

जोनाथन कॅम्पबेलने कसोटी पदार्पणापूर्वी ३४ प्रथम श्रेणी सामने खेळले. यामध्ये त्याने चार शतकांसह १,९१३ धावा केल्या. एक उत्कृष्ट फिरकीपटू म्हणून त्याने ४२ विकेट्स घेतल्या, त्यात चार विकेट्सचा समावेश आहे. कॅम्पबेलने मे २०२४ मध्ये चितगाव येथे बांगलादेशविरुद्ध टी-२० पदार्पण केले.

“झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एर्विनने कौटुंबिक कारणामुळे आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीतून माघार घेतली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा जोनाथन कॅम्पबेल संघाची कमान सांभाळणार आहे.” असे झिम्बाब्वे क्रिकेटने एका निवेदनात म्हटले आहे.