Zimbabwe registered their highest score in ODI cricket: सध्या झिम्बाब्वेमध्ये एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेचे पात्रता फेरीचे सामने खेळले जात आहेत. या फेरीमध्ये झिम्बाब्वेचा संघ चांगलाच फॉर्ममध्ये दिसत आहे. अमेरिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ गडी गमावून ४०८ धावांची ऐतिहासिक मजल मारली. संघाकडून कर्णधार शॉन विल्यम्सने १७६ धावांची शानदार खेळी केली.
झिम्बाब्वेने वनडे इतिहासात प्रथमच ४०० धावांचा टप्पा पार केला. कर्णधार सीन विल्यम्सशिवाय जॉयलॉर्ड गुंबीने १०३ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ७८ धावा केल्या. त्याचबरोबर सिकंदर रझाने ४८ आणि रायन बर्लने ४७ धावा केल्या. रझाच्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता, तर रायन बर्लने ३ चौकार आणि ४ षटकार ठोकले.
कर्णधार सीन विल्यम्सचे द्विशतक हुकले –
या ऐतिहासिक धावसंख्येमध्ये कर्णधार सीन विल्यम्सचे झिम्बाब्वेकडून द्विशतक हुकले. विल्यम्स त्याच्या द्विशतकापासून २६ धावा दूर राहिला. त्याने १०१ चेंडूत २१ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १७४ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १७२.२८ होता. ३६ वर्षीय कर्णधार विल्यम्स आतापर्यंत पात्रता सामन्यांमध्ये आपल्या संघासाठी उत्कृष्ट लयीत दिसला आहे. त्याने नेपाळविरुद्धच्या सामन्यात नाबाद १०२, नेदरलँडविरुद्ध ९१ आणि आता अमेरिकेविरुद्ध १७४ धावांची खेळी केली.
हेही वाचा – Virat Kohli: आयपीएल २०२३ मध्ये किंग कोहलीचा सोशल मीडियावर दबदबा, ‘या’ बाबतीत चाहत्यांनी बनवले नंबर वन
३६ वर्षीय कर्णधार विल्यम्स आतापर्यंत क्वालिफायर सामन्यांमध्ये आपल्या संघासाठी उत्कृष्ट लयीत दिसला आहे. त्याने नेपाळविरुद्धच्या सामन्यात नाबाद १०२, नेदरलँडविरुद्ध ९१ आणि आता अमेरिकेविरुद्ध १७४ धावांची खेळी केली. अमेरिकने ४०९ धावांचा पाठलाग करताना १७.३ षटकानंतर ७ बाद ७५ धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी अजून ३३४ धावांची गरज आहे. सध्या खेळपट्टीवर अभिषेक पराडकर २४ आणि जयदीप सिंग १ धावेवर खेळत आहेत.