शेन शिलिंगफोर्डने घेतलेल्या १० विकेट्सच्या जोरावर वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेवर दुसऱ्या कसोटीत एक डाव आणि ६५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह वेस्ट इंडिजने दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. शिलिंगफोर्डच्या ५ विकेट्सच्या जोरावर वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा पहिला डाव १७५ धावांतच गुंडाळला. ख्रिस गेल आणि शिवनारायण चंद्रपॉल यांनी शानदार शतके झळकावली. दिनेश रामदीनने ८६ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजने ३८१ धावा केल्या. दुसऱ्या डावातही झिम्बाब्वेच्या फलंदाजांना शिलिंगफोर्डच्या फिरकीचे कोडे उलगडले नाही. झिम्बाब्वेचा दुसरा डाव १४१ धावांतच आटोपला. शिलिंगफोर्डने ३४ धावांत ५ बळी घेतले. सामन्यात दहा विकेट्स घेणाऱ्या शिलिंगफोर्डला सामनावीर तसेच मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Story img Loader