आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर झुल्करेन हैदरने एका भारतीय वृत्तवाहिनीवर यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानची जोरदार क्लास घेतली आहे. जुल्करेनने रिझवानचे नाव घेतले नसले तरी तो जे काही बोलला त्यावरून तो कोणासाठी हे बोलत आहे, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. रिझवान अर्धशतक,शतक झळकावल्यानंतर मैदानावर नमाज पठण करताना दिसला आहे. याशिवाय पाकिस्तान जेव्हा फायनलमध्ये पोहोचला तेव्हा रिझवान म्हणाला होता की, अल्लाहमुळेच पाकिस्तान इथपर्यंत पोहोचला आहे.
इंडियन न्यूज चॅनेलवर झुल्करेन म्हणाला, ‘तुमची नमाज कुठे गेली? तू नमाज पठण केली होतीस, मग तुम्ही फायनल का जिंकली नाहीस? एक १५ वर का आऊट झाला, एक १४ वर आऊट झाला. कोण कुठं गेला? भाऊ, तुम्ही तुमच्यासाठी नमाज पठण करायची . तुम्हाला नमाज तुमच्या पूजेसाठी पठण करायची असते, कोणत्याही धर्मासाठी नाही. दाखवण्यासाठी तुम्ही नमाज पठण करु नये. तर आता कुठे गेली तुमची नमाज, तू फायनल जिंकली नाहीस. तुमच्या नमाजपेक्षा इंग्लंडचे दोन मुसलमान जिंकले. कारण ते तुमच्यापेक्षा चांगले मुस्लिम आहेत. ते मैदानावर दाखवत नाहीत. मोईन अली आणि आदिल रशीद हे इंग्लंडचे दोन मुस्लीम मैदानात नमाज पठण करत नाहीत.
हेही वाचा – IPL 2023: केकेआर आणि एसआरएच बीसीसीआयला देणार ‘या’ रिलीज-रिटेन खेळाडूंची यादी
तो पुढे म्हणाला, ”फोटोमध्ये दिसण्यासाठी ते तुमची नमाज पठण करत नाहीत. हाशिम आमला मैदानावर नमाज पठण करत नाही कारण तो मैदानाबाहेर चांगला मुस्लिम आहे. भाऊ तुम्ही झिम्बाब्वेकडून का हरलास, तुझ्यासाठी नमाज पठण करावी लागेल. फायनलमध्ये पोहोचल्याबद्दल अल्लाचे आभार माना.” पाकिस्तानने सुपर-१२ मधील पहिले दोन सामने गमावले होते आणि ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर होते. परंतु नंतर तीनही सामने जिंकून आणि दक्षिण आफ्रिकेच्या नेदरलँड्सकडून पराभूत होऊन उपांत्य फेरी गाठली.