अर्ध्या चक्रापणे दिसणारे हे आसन केल्याने पाठीचा कणा लवचिक होतो आणि कण्याला जोडलेले मज्जातंतू बळकट होतात. मान अधिक मजबूत होते आणि श्वसनक्रिया सुधारते.
कसे करावे?
आणखी वाचा
* पाठीला हातांनी कमरेजवळ आधार द्या. हाताची सर्व बोटे जमिनीच्या दिशेने वळलेली असावीत.
* डोके मागे न्या. मानेचे स्नायू ताणले जातील.
* मागे झुकताना श्वास सावकाश आत घ्या. पूर्ण झुकल्यानंतर श्वास सोडा.
* अशाच स्थितीत १०-३० मिनिटे राहा. श्वासोच्छ्वास सुरूच ठेवा.
* उच्छ्वास सोडत हळूहळू पुन्हा सरळ उभे राहा.