कसे करावे?

सूर्यनमस्कार करताना जी आसने केली जातात, त्यापैकी हे एक आसन आहे. पाठ आणि पोट यांचे स्नायू मजबूत होण्यास या आसनाचा उपयोग होतो. या आसनाने पाठीचे सर्व स्नायू ताणले जातात. पाठीचा कणा मजबूत होतो.

* ताठ उभे राहा. दोन्ही हात सरळ रेषेत वर करा.

* आता श्वास घेत पुढे झुका. श्वास सोडत कंबरेमध्ये वाकून हात पायाच्या दिशेने न्या.

* दीर्घ श्वास घेऊन २० ते ३० सेकंद या स्थितीत थांबा.

* पाय आणि मणका ताठ राहू द्या. हात पावलांवर किंवा पायांशेजारी जमिनीवर टेकवा.

* श्वास सोडत छाती गुडघ्याकडे नेऊ या. नितंब वर उचलू या. डोके पायांजवळ सैल सोडावे.

* श्वास घेत हात वर करून हळूहळू उभे राहा.

Story img Loader