कटी म्हणजे कंबर. कटी चक्रासन म्हणजे कंबरेतून शरीर फिरवणे होय. या आसनामुळे कंबरेला ताण बसून ती आणखी लवचिक बनते. या आसनामुळे अपचनाची तक्रार दूर होते.
कृती :
* दोन्ही पायांत काही अंतर ठेवून उभे राहा.
* श्वास घेत दोन्ही हात सरळ पुढे करा. तळहात एकमेकांकडे करून हात जमिनीला समांतर ठेवा.
* श्वास सोडत कंबरेला पीळ देऊन हळुवार उजवीकडे वळा. उजव्या खांद्यावरून मागे पाहा.
* तळहातातील अंतर एकसारखे राहू द्या. श्वास घेत आसन सोडा.
* आता डाव्या बाजूला वळत आसन करा.