ज्योती चौधरी-मलिक
तांदळाची भाकरी तर आपण खातो. आज थोडी वेगळ्या प्रकारची भाकरी पाहू.
साहित्य – वरीचे पीठ, थोडे तिखट, मीठ, थोडेसे दूध
कृती-एका परातीत पीठ, तिखट, मीठ घालून कालवून घ्या. त्यात दूध घाला. आता नेहमीच्या भाकरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवा. तव्यावर टाका. फक्त नेहमीच्या भाकरीप्रमाणे वरून पाणी फिरवू नका. उलटा, चांगली शेका. तूप लावून गरम असतानाच खा. यासोबत नारळाची चटणीही छान लागेल.