साहित्य – ४ मोठाली सफरचंद, पिकलेली चालतील पण भुसभुशीत नकोत. १वाटी मैदा, चिमूटभर सोडा, १ वाटी साखर, २ वाटय़ा पाणी, तूप, खायचा रंग.

कृती –  सफरचंद धुऊन, पुसून घ्या. गुलाबजामकरता जसा करतो त्याप्रमाणे साखरेचा पाक करून घ्या. त्यात वेलची पूड मिसळून ठेवा. मैद्यात थोडं दूध, पाणी घाला आणि भज्यांच्या पिठापेक्षा थोडं पातळ मिश्रण तयार करा. यात थोडासा सोडाही घाला. जर खायचा रंग घालायचा असेल तर तोही आत्ताच या पिठात घालून घ्या. सफरचंदाच्या आडव्या गोल चकत्या करा. मधला बी असलेला भाग हलक्या हाताने पोखरून घ्यावा. आता तूप तापवत ठेवा. सफरचंदाच्या चकत्या मैद्याच्या पिठात बुडवून तुपामध्ये सोनेरी होईपर्यंत तळाव्यात. त्यांचा एक घाणा झाल्यावर तो पाकात बुडवून ठेवा. मग दुसरा घाणा तळून झाल्यावर पहिला पाकातून बाहेर काढा. मस्त कुरकुरीत झटपट जिलेबी तय्यार.

Story img Loader