गणेशोत्सवाची धामधूम घरोघरी सुरू झाली आहे. सजावटीच्या नव-नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची धडपड प्रत्येकजण करत आहे. घरातील अत्तराच्या बाटलीतील अत्तर संपले, तरी त्या बाटल्या आणि त्यांची झाकणे त्यांचे सुंदर आकार पाहता टाकाविशी वाटत नाहीत. अशी झाकणे गोळा करून ठेवल्यास त्यांचा पुनर्वापर करता येतो. तो कसा ते आज पाहू..

साहित्य –

अत्तारच्या बाटलीची झाकणे, इलेक्ट्रॉनिक टी लाईट दिवे, गम (फेव्हिबाँड).

कृती

*      विविध आकाराची झाकणे, इलेक्ट्रॉनिक टी लाईटवर गमने चिकटवावीत

*      आकर्षक पद्धतीने रचना करावी

*      ही रचना रांगोळीच्यामध्ये ठेवल्यास तिचे रंग उजळतील.

*      टेबल किंवा टीपॉयवर सेंटर पिस म्हणूनही ही कलाकृती ठेवता येईल.

*      भेटवस्तू म्हणूनही देऊ शकता.

apac64kala@gmail.com

Story img Loader