भक्ती परब

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्याचे प्रभावी माध्यम असणाऱ्या विविध अ‍ॅपवरील वेबसिरीज या सेन्सॉरशिपपासून अलिप्त होत्या. वेबसीरिजवरही आता सेन्सॉरशिप येऊ  घातली आहे. या निर्णयामुळे तरुण वर्ग मात्र अजिबातच खूश नाही. काय पाहायचं ते मी ठरवेन असं ठाम मत तरुणाईने व्यक्त केलंय..

ऑनलाइन व्हीडिओ प्लॅटफॉर्मवर आता धार्मिक भावना दुखावणारी, हिंसक आणि अश्लील दृश्ये यांच्यावर बंधने येणार आहेत. कारण नेटफ्लिक्स, अल्ट बालाजी, हॉटस्टार, सोनी लिव, इरॉस नाऊ, झी ५, वूट या अ‍ॅपवर आधारित ओटीटी प्लॅटफॉर्मकडून सेल्फ सेन्सॉरशिपचा करार मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे निर्मात्यांवर मर्यादा येणार आहेत. त्याचबरोबर अ‍ॅमेझॉन प्राइम, फेसबुक आणि गुगल यांनी सेन्सॉरशिपबाबत सरकारी आदेशाची वाट पाहणे पसंत केले आहे. परंतु सेक्रेड गेम्स, मिर्झापूरसारख्या वेबसीरिजमधील काही दृश्यांवर आक्षेप घेणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या. हे पाहता येत्या काळात ऑनलाइन माध्यमांवर पाहता येणाऱ्या आशयावर बंधने येणार हे स्पष्ट झाले आहे. देशात ऑनलाइन माध्यमावर आशय पाहणारे १० कोटीच्या आसपास ‘सबस्क्रायबर’ आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे आशय निर्माते आणि कलाकारांचे सर्जनशील स्वातंत्र्य आणि पाहणाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य याला धक्का न लावता या ऑनलाइन माध्यमाचे नियमन व्हावे, अशी आशा या माध्यमातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अ‍ॅपवर वेबसीरीज पाहणारा तरुण वर्ग अधिक आहे. त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असल्या तरी ही सेन्सॉरशिप मान्य नसल्याचेच दिसून येत आहे.

समाजमाध्यम (सोशल मीडिया) मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या भूषण कदमने सांगितले की सेल्फ सेन्सॉरशिप आली हे चांगले झाले. त्या ऐवजी सरकारी सेन्सॉरशिप आली असती, तर आशयावर मर्यादा आल्या असता. मी स्वत: गेम ऑफ थ्रोन, सेक्रेड गेम्स ते मिर्झापूर अशा वेबसीरिज पाहिल्या आहेत. काहींनी या वेबसीरिज अश्लील आणि हिंसक दृश्ये असल्यामुळे यातील काही दृश्यांवर बंदी आणावी, अशी मागणी केली होती. पण मला वाटते याची काही आवश्यकता नाही. अशा प्रकारचा आशय पाहणे न पाहणे प्रेक्षकाच्या हाती असते. ऑनलाइन अ‍ॅप्सवर अशा प्रकारचा आशय दाखवला जातो, तेव्हा त्याखाली या आशयात काय दाखवले जाणार आहे ते सांगितले जाते, एक सूचना असते, तरीही आपण तो आशय पाहणे किंवा न पाहणे आपल्या हातात आहे. त्यामुळे मला वाटते कोणत्याच प्रकारची बंधने ऑनलाइन आशयावर नसावीत. परंतु सरकारने हस्तक्षेप करून सेन्सॉर आणण्यापेक्षा सेल्फ सेन्सॉरशिपचा पर्याय तुलनेने ठीक आहे.

ऑनलाइन आशयावर मुळातच बंधने हवीत कशाला, कारण तो आशय बघायचा की नाही हे आपणच निवडलेले असते, असे गणेश साबळे याला वाटते. वेबसीरिजमध्ये कथेच्या अनुषंगाने येणारी दृश्ये असतात. त्यात अवास्तवपणा नसतो किंवा आक्षेपार्ह काही नसते. उलट अल्ट बालाजी या अ‍ॅपवर अवास्तव मांडणी दिसते, ती खटकते, सेल्फ सेन्सॉरशिप आल्यामुळे यापुढे वेबसीरिज निर्मातेच आपला आशय कायद्याच्या कचाटय़ात अडकू नये, याची काळजी घेतील. ऑनलाइन माध्यमांवर काय पहावे, याचे स्वातंत्र्य असलेच पाहिजे, या मुद्दय़ावर ठाम असल्याचे तो म्हणाला.

एकंदरीत सेन्सॉरशीप नसावी किंवा असावी अशी दोन मते सध्या तरुणाईमध्ये आहेत. यात नसावी म्हणणारी तरुणाई जास्त आहे. ऑनलाइन माध्यमावर व्हीडिओ पाहताना कळत नकळत मनावर परिणाम होत असतो. यामुळे समाजमन बिघडू शकते. मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ  शकतो. असे मत हर्षदा, योगेश, धनंजय आणि अश्विनी यांनी व्यक्त केले आहे.

निवड माझ्या हातात..

कॉन्टेट रायटर असणारी विधिता पाटकर म्हणाली की, दूरचित्रवाणी आणि चित्रपट यावर सेन्सॉरशिप असते. ही माध्यमे आपण समूहाने बघतो. पण ऑनलाइन माध्यमावर कुठलेही बंधन असता कामा नये. कारण मी माझ्या मोबाइलवर एकटीने वेबसीरिज पाहते. त्यामुळे काय बघायचे आहे, काय नाही, याची मी निवड समर्थपणे करू शकते. घरात कुटुंबातील कोणा सदस्याने टीव्ही लावल्यास आपल्याही तो पाहण्याखेरीज पर्याय उरत नाही. पण मोबाइलवर पाहत असलेल्या आशयाचे तसे नाही. मी काय पहायचे, कधी पाहायचे हे मी निवडू शकते. मलाच जर अशी अश्लील किंवा हिंसक दृश्ये असणारी सीरिज नाही पहायची, तर मी नाही बघणार. त्याऐवजी मला रुचेल, अशी सीरिज मी निवडेन त्यासाठी बंधने कशाला, असे विधिता म्हणते.

‘सेल्फ सेन्सॉरशिप ’लागू केल्याचा आनंद वाटतो. यामुळे सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल आणि निर्माते अधिक सजगतेने सादरीकरण करतील. जे त्यांच्या प्रेक्षकांना आवडेल आणि ते चांगल्या प्रतिक्रिया देतील. अशा प्रकारची सेन्सॉरशिप ब्रॉडकास्ट मीडियामध्ये चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि त्याचा फायदाही होत आहे.

-अशोक नंबिस्सन, सोनी लिव प्रवक्ते.